Health Care : निरोगी आरोग्यासाठी रोज मूठभर भाजलेले चणे खा, जाणून घ्या चणे खाण्याचे फायदे!
चणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. चणे हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अनेकांना फक्त चवीपुरते भाजलेले चणे खायला आवडतात. मात्र, चणे फक्त चवीसाठीच नाहीतर ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. भाजलेल्या चणामध्ये कॅलरीज कमी असतात.
मुंबई : चणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. चणे हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अनेकांना फक्त चवीपुरते भाजलेले चणे खायला आवडतात. मात्र, चणे फक्त चवीसाठीच नाहीतर ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. भाजलेल्या चणामध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे ते निरोगी स्नॅक म्हणून वापरले जाऊ शकते.
भाजलेल्या चणामध्ये जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. भाजलेल्या चणामध्येही फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यात प्रथिने आणि लोह देखील भरपूर आहे. त्यामुळे ते खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते. सकाळी भाजलेले चणे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अशक्तपणा असलेल्यांनी भाजलेले चणे सेवन करावे. त्याच्या मदतीने अॅनिमियाच्या कमतरतेवर मात करता येते. इतकेच नाही तर ते रोगप्रतिकारक शक्तीसाठी वाढवण्यासाठी देखील चणे खूप फायदेशीर आहेत.
रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर
भाजलेल्या चण्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जी आरोग्यासाठी चांगली मानली जातात. चणे खाल्ल्याने पचनक्रिया बळकट होण्यास मदत होते. एवढेच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासही मदत होते.
ऊर्जा मिळते
भाजलेल्या चणामध्ये जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. भाजलेल्या चणामध्येही फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यात प्रथिने आणि लोह देखील भरपूर आहे. ते खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उर्जेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आपण आपल्या आहारात भाजलेल्या चण्याचा समावेश करा.
रक्तातील साखर
भाजलेले चणे खाणे मधुमेहींसाठी खूप फायदेशीर मानले जाते. भाजलेले चणे खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. याचे रोज सेवन केल्याने साखरेची समस्या दूर होते.
हाडांसाठी फायदेशीर
हाडे मजबूत करण्यासाठी भाजलेले चणे खूप फायदेशीर आहेत. चण्यामध्ये कॅल्शियम असल्याने ते हाडांसाठी फायदेशीर आहेत. चणे खाल्ल्याने कमकुवत हाडे मजबूत होण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
Weight Loss | ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!
Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Eating roasted chickpeas is extremely beneficial for health)