Disadvantages : अंडी खाण्याचे शाैकिन आहात?, जाणून घ्या त्यामुळे होणारे नुकसान!
निरोगी राहण्यासाठी फक्त व्यायाम (Exercise) करणेच पुरेसे नसून आपल्याला आपल्या खाण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. तज्ज्ञांच्या मते व्यायाम केल्याने आपले शरीर सक्रिय राहते. वर्कआउट करणारे लोक तंदुरुस्त राहण्यासाठी डाएटमध्ये (Diet) मोठ्या प्रमाणात अंड्यांचा (Eggs) समावेश करतात.
मुंबई : निरोगी राहण्यासाठी फक्त व्यायाम (Exercise) करणेच पुरेसे नसून आपल्याला आपल्या खाण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. तज्ज्ञांच्या मते व्यायाम केल्याने आपले शरीर सक्रिय राहते. वर्कआउट करणारे लोक तंदुरुस्त राहण्यासाठी डाएटमध्ये (Diet) मोठ्या प्रमाणात अंड्यांचा (Eggs) समावेश करतात. अंड्यांमध्ये प्रथिने आणि अनेक पोषक घटक असतात. हे हृदयापासून डोळ्यांपर्यंत काळजी घेते. यामुळेच नेहमी अंडी खाण्याचा सल्ला अनेक वेळा दिला जातो. मात्र, काही लोक प्रमाणाच्या बाहेर अंड्यांचे सेवन करतात, जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कोणतीही गोष्ट शरीरासाठी कितीही चांगली असली तरीही प्रमाणामध्येच सेवन करणे आवश्यक असते.
रक्तातील साखरेची पातळी
अंड्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. अंड्यामध्ये कोलेस्टेरॉल असते, त्यामुळे त्यामध्ये फॅट देखील भरपूर असतात. तज्ज्ञांच्या मते, फॅटचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात इन्सुलिन अस्थिर होते. मधुमेहासारखा गंभीर आजार देखील यामुळे होऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीने दररोज दोन अंडी खाणे आवश्यक आहे. दोन अंड्यांपेक्षा अधिक अंडी खाणे पूर्णपणे टाळाच.
वजन वाढण्याची देखील शक्यता
वजन कमी करण्यासाठी बरेच लोक आहारामध्ये अंडाचा समावेश करतात. मात्र, अंड्याचे अतिसेवन केल्याने वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते. जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढू लागते आणि वजन वाढू लागते. एका व्यक्तीने एका दिवसात सुमारे 2400 कॅलरीज घेतल्या पाहिजेत, परंतु अधिक अंडी खाल्ल्याने ही पातळी वाढेल.
कोलेस्ट्रॉल वाढण्याची भिती
असे म्हटले जाते की एक अंडे खाल्ल्याने 180 किलो कोलेस्ट्रॉल शरीरात पोहोचते आणि याच कारणामुळे एक किंवा दोन अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि तुम्हाला हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. ज्यांना अंडी जास्त खायला आवडतात त्यांनी त्यातील पिवळा भाग खाऊ नये. त्याऐवजी अंड्याचा पांढरा वापर करा.
(वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहेत, सेवनापूर्वी डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या)
संबंधित बातम्या :
Weight loss Tips : जिऱ्याचे पाणी वजन कमी करते, मात्र या गोष्टींची विशेष काळजी घ्या!
Health care tips : उन्हात निरोगी राहण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा