Health Care Tips : अधिक प्रमाणात मांस खाणे टाळा आणि आरोग्याच्या या समस्या दूर करा!

मांसमध्ये (Meat) असलेले पोषक घटक शरीरासाठी फायदेशीर असतात. तज्ञांच्या मते, मांस कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होण्यास मदत होते. ते मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे देखील होतात.

Health Care Tips : अधिक प्रमाणात मांस खाणे टाळा आणि आरोग्याच्या या समस्या दूर करा!
मांसचे सेवन करताना या गोष्टी लक्षात ठेवा. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 9:05 AM

मुंबई : मांसमध्ये (Meat) असलेले पोषक घटक शरीरासाठी फायदेशीर असतात. तज्ञांच्या मते, मांस कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होण्यास मदत होते. ते मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे देखील होतात. तसेच काही लोकांना नॉनव्हेज (Nonveg) खाणे इतके आवडते की ते दररोज मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात सेवन करतात. असं म्हणतात की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे शरीरासाठी घातक आणि धोकादायकच आहे. जर आपणही जास्त प्रमाणात मांसचे सेवन करत असाल तर ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

संशोधनातून काय पुढे आले जाणून घ्या!

अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, मांसमुळे बहुतांश लोकांना कर्करोग आणि हृदयविकाराचा त्रास होतो. मांसाहारामुळे शरीरात कोलेस्टेरॉल आणि चरबी वाढू लागते आणि एखादे वेळी बाधित व्यक्तीला हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. आम्‍ही तुम्‍हाला मांस खाणे बंद केल्‍याने तुम्‍हाला कोणते आरोग्याचे फायदे मिळतात याबद्दल आज सविस्तरपणे सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात.

कोलेस्टेरॉलची पातळी वाढते

जे लोक जास्त मांस खातात त्यांच्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या असते. असे म्हटले जाते की मांसामध्ये असलेल्या चरबीमुळे कोलेस्ट्रॉल वाढते. अशा परिस्थितीत जर तुम्ही मांस खाणे बंद केले तर शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. त्याच्या नियंत्रणामुळे हृदयविकारांपासून बचाव होऊ शकतो. यामुळे मांसचे प्रमाणाबाहेर सेवन करणे टाळाच.

वजन वाढण्याची समस्या

संशोधनात असे समोर आले आहे की, मांसचे सेवन चुकीच्या पद्धतीने केले तर त्यामुळे वजनही वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते, जे लोक मांस खाणे बंद करतात त्यांना वजन कमी करणे सोपे जाते. मांस ऐवजी तुम्ही तुमच्या दररोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्याचा समावेश करणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. कारण ते शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करतात, तसेच वजन कमी करण्यासही मदत करतात.

संबंधित बातम्या : 

EYE : डोळ्यांखालील काळे डाग आणि सुरकुत्यांची समस्या दूर करण्यासाठी हे उपाय फायदेशीर! 

Skin Care : या घटकांसह घरीच नैसर्गिक ब्लीच बनवा आणि उन्हाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.