Egg | अंड्याचा पिवळा बलक तुम्हीही फेकून देता? वाचा मग याचे फायदे…
अंड्याचा पिवळा भाग देखील सौंदर्यासाठी वापरा. याच्या मदतीने तुम्ही सहज फेस मास्क बनवू शकता. हा मास्क बनवण्यासाठी तुम्ही फक्त अंड्याचा पिवळा भाग फेटा आणि नंतर तो तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तसेच राहूद्या. वीस मिनिटांनी स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुवा.
मुंबई : धावपळीच्या जीवनात आहाराकडे (Diet) अजिबात लक्ष देणे होत नाही. मात्र, जे लोक वर्कआऊट करतात, ते आपल्या आहाराकडेही लक्ष देतात. यामुळेच लोक हेल्दी डाएट फॉलो करतात, अशा स्थितीत हे लोक काय खात आहेत, त्यांच्या शरीरावर काय परिणाम होत आहेत, यावर त्यांचे सर्व लक्ष असते. यामुळेच लोक प्रथिनयुक्त (Protein rich) अंडी खातात. अंड्यांचा पिवळा भाग वेगळा करून तो फॅट फ्री बनवतात. जर तुम्ही देखील असे करत असाल तर अंडे (Egg) खाल्ल्यानंतर त्याचा पिवळा भाग फेकून देण्याऐवजी आपण त्याचा अनेक प्रकारे उपयोग नक्कीच करू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात अंड्याच्या पिवळ्या बलकचे फायदे.
वाचा अंड्याच्या पिवळ्या बलकचे फायदे…
- अंड्याचा पिवळा भाग देखील सौंदर्यासाठी वापरा. याच्या मदतीने तुम्ही सहज फेस मास्क बनवू शकता. हा मास्क बनवण्यासाठी तुम्ही फक्त अंड्याचा पिवळा भाग फेटा आणि नंतर तो तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तसेच राहूद्या. वीस मिनिटांनी स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुवा. या मास्कमुळे आपली त्वचा चमकदार दिसण्यास मदत होईल.
- अंड्याचा पिवळा भाग केसांसाठी उत्तम कंडिशनर म्हणून वापरला पाहिजे. ते तुमच्या केसांना पोषण आणि मॉइश्चराइझ करते. ते वापरण्यासाठी तुम्ही एका भांड्यात अंड्याचा पिवळा घ्या आणि 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल आणि 1 कप पाणी घाला. नंतर ते केसांना लावा आणि सुमारे 15 मिनिटे सोडा आणि नंतर शॅम्पूने केस धुवा.
- चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी आपण अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये मध मिक्स करावा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर ही पेस्ट सुकल्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील टॅन जाण्यास मदत होते.
- केक खायला सगळ्यांनाच आवडते. म्हणूनच आपण अनेकदा केक घरीच बनवतो, जर आपण अंड्याचा पिवळा भाग केकसाठी वापरला तर केस अधिक स्पॉन्जी बनतो. जर तुम्ही अंडी खात असाल तर अंड्याचा पिवळा भाग तुमच्या केकमध्ये घाला. यामुळे केक अधिक चवदार बनण्यास मदत होईल.
संबंधित बातम्या : Vegetable : ‘या’ भाज्यांचा आहारामध्ये समावेश करा आणि निरोगी जीवन जगा!
Health Care Tips : चहासोबत या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक…