Eid UI Fitr 2022: ईदच्या दिवशी हा खास खजूर मिल्क शेक घरी तयार करा, जाणून घ्या रेसिपी!
जर तुम्हाला चविष्ट खजूर मिल्क शेक बनवायचा असेल तर सर्वप्रथम 15 ते 20 खजूर रात्री पाण्यात भिजत ठेवा. आता एक भांडे घ्या आणि त्यात दूध गरम करा आणि इतके गरम करा की ते थोडे घट्ट होईल. दूध गरम करताना त्यात भिजवलेले खजूर घालून उकळी आल्यावर थंड होण्यासाठी ठेवा. आता मिक्सरमध्ये दूध आणि खजूर टाका आणि बारीक करून घ्या.
मुंबई : ईदचा (Eid) सण आज देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. ईदच्या या खास दिवशी आज आपण घरी खजूर मिल्कशेकच्या खजुरापासून बनवू शकता. हा शेक खाण्यासाठी खूप जास्त चवदार आहे. हा शेक घरी कसा बनवायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, खजूर (khajoor) खाणे आपल्या आरोग्यासाठी किती जास्त फायदेशीर आहे. चविष्ट असण्यासोबतच याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत, या शेकचे. यामुळे आपली पचनक्रिया (Digestion) मजबूत होते, तसेच शरीराचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊयात या खजूर मिल्कशेकची रेसिपी.
खजूर मिल्कशेक तयार करण्याची पध्दत
जर तुम्हाला चविष्ट खजूर मिल्क शेक बनवायचा असेल तर सर्वप्रथम 15 ते 20 खजूर रात्री पाण्यात भिजत ठेवा. आता एक भांडे घ्या आणि त्यात दूध गरम करा आणि इतके गरम करा की ते थोडे घट्ट होईल. दूध गरम करताना त्यात भिजवलेले खजूर घालून उकळी आल्यावर थंड होण्यासाठी ठेवा. आता मिक्सरमध्ये दूध आणि खजूर टाका आणि बारीक करून घ्या. मग त्यामध्ये मध आणि काही ड्रायफ्रुट्स घाला. आता ते बारीक करून मग एका ग्लासमध्ये काढा. आता अशाप्रकारे आपला खजूर मिल्कशेक तयार आहे.
खजूर मिल्कशेक खाणे आरोग्यासाठी फायदेशीर
डोळ्यांसाठी फायदेशीर दररोज खजूर खाणे डोळ्यांसाठी चांगले आहे. खजुरामध्ये व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे ज्यांना डोळ्यांसंबंधीत काही त्रास आहे अशांनी खजूर खाल्ल्ये पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढते खजूरमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोईड्स, फिनोलिक अॅसिड असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, ज्यामुळे आपल्या त्वचेला फायदा होतो. शारिरीक कमजोरी, शरीरात रक्ताची कमी किंवा हृदयरोग या समस्या दूर खजूर करते.