Eid ul fitr 2022 : ईदनिमित्त घरी तयार करा खास गोड शेवया, जाणून घ्या स्पेशल रेसिपी!

सुकामेवा, 2 कप शेवया, 1 कप कंडेन्स्ड दूध, बारीक केलेले बदाम, तूप, 50 ग्रॅम खवा. 1 टीस्पून हिरवी वेलची पावडर 3 चमचे मनुका इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे. सर्वात अगोदर शेवया तुपात तळून घ्या. एका पॅनमध्ये तूप गरम करा, शेवया घाला आणि सुगंधित आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा आणि गॅस मंद आचेवर ठेवा.

Eid ul fitr 2022 : ईदनिमित्त घरी तयार करा खास गोड शेवया, जाणून घ्या स्पेशल रेसिपी!
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 10:32 AM

मुंबई : मुस्लिम समाजात ईदचा (Eid) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ईद हा इस्लाम धर्मातील सर्वात खास सणांपैकी एक आहे. या दिवशी विविध स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. त्यात दूध (Milk) फेणी, शीरमल आणि बाकरखानी इ. ईदला गोड शेवयाचा आनंद देखील मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्याला मिठी सेवियां असेही म्हणतात, विशेष म्हणजे मिठी सेविया हे जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी आवडतात. घरी सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांचा (Food) वापर करून तुम्ही गोड शेवया बनवू शकता. हे बनवण्यासाठी तुम्हाला शेवया, दूध, बदाम, तूप आदी साहित्य लागणार आहे. चला तर बघूयात गोड शेवयांची रेसिपी.

गोड शेवयाचे साहित्य

सुकामेवा, 2 कप शेवया, 1 कप कंडेन्स्ड दूध, बारीक केलेले बदाम, तूप, 50 ग्रॅम खवा. 1 टीस्पून हिरवी वेलची पावडर 3 चमचे मनुका इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे. सर्वात अगोदर शेवया तुपात तळून घ्या. एका पॅनमध्ये तूप गरम करा, शेवया घाला आणि सुगंधित आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा आणि गॅस मंद आचेवर ठेवा. दूध उकळून त्यात साखर घाला. कढईत दूध उकळवा, त्यात चिरलेला काजू घाला आणि 3 मिनिटे शिजवा, साखर घाला आणि विरघळू द्या. आता त्यात कंडेन्स्ड दूध घालून मंद आचेवर दुधात चांगले मिसळेपर्यंत शिजवा.

जाणून घ्या रेसिपी!

दुधात शेवया घाला आणि कोरडे होईपर्यंत शिजवा. खवा बारीक किसून दुधात मिसळा. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा, शेवया घाला आणि 5 मिनिटे शिजवा. आता वेलची घाला आणि चांगले मिसळा. आता त्यावर चिरलेल्या ड्रायफ्रुट्सने सजवा. थंड सर्व्ह करा. या गोड शेवया खाण्यासाठी अत्यंत चवदार आहेत. विशेष म्हणजे या रेसिपीसाठी तुम्हाला काहीही बाजारातून विकत घेण्याची अजिबात गरज नाहीये. आपल्या घरामध्ये असलेल्या साहित्याच्या मदतीने आपण ही रेसिपी तयार करू शकतो.

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.