Morning Habits : दिवसभर उत्साही राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा!

सकाळी आपल्या दिवसाची सुरूवात कशी होते. त्यावर आपला संपूर्ण दिवस आधारीत असतो. जर तुमच्या दिवसाची सुरवात चांगली झाली नाही तर संपूर्ण दिवस खराब होतो. सकाळी लवकर उठून व्यायाम करा. त्यानंतर निरोगी नाश्त्याचे सेवन करा. यामुळे तुमच्या दिवसाची सुरूवात चांगली होते.

Morning Habits : दिवसभर उत्साही राहण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा!
Good Habits
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 4:36 PM

मुंबई : सकाळी आपल्या दिवसाची सुरूवात कशी होते. त्यावर आपला संपूर्ण दिवस आधारीत असतो. जर तुमच्या दिवसाची सुरवात चांगली झाली नाही तर संपूर्ण दिवस खराब होतो. सकाळी लवकर उठून व्यायाम करा. त्यानंतर निरोगी नाश्त्याचे सेवन करा. यामुळे तुमच्या दिवसाची सुरूवात चांगली होते. दिवसाची सुरूवात चांगली झाल्याने आपला मूड देखील फ्रेश राहतो. (Follow these tips to stay fresh throughout the day)

सकाळी फिरायला जा

सकाळी उठल्यानंतर, थोड्यावेळ चालायला जा आणि सूर्य किरण अंगावर येऊ द्या. सूर्याच्या नैसर्गिक प्रकाशामुळे तुमची ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटते. सूर्यप्रकाश तुमच्या मानसिक आरोग्यासाठी देखील उत्तम आहे.

फळे खा

फळे अत्यंत निरोगी असतात. नाश्त्यासाठी तुम्ही फळे घेऊ शकता. ते तुम्हाला ऊर्जा देतात, तुम्हाला नैसर्गिक चमक देतात. सकाळी तुम्ही तुमच्या आवडीचे फळ नक्कीच खावे. फळे तुमच्या शरीराला सर्व आवश्यक जीवनसत्वे आणि पोषक तत्त्वे पुरवतात जी तुम्हाला उत्साही ठेवतात.

थंड शॉवर घ्या

बऱ्याच वेळा आपल्याला आंघोळ करताना आळस येतो. मात्र, आंघोळ केल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटते आणि उत्साह येतो. थंड शॉवर केवळ तुम्हाला ताजेतवाने करत नाही तर झोप देखील दूर करते.

नाश्ता करा

तुमचे सकाळचे पहिले जेवण चव, ऊर्जा आणि आरोग्याने परिपूर्ण असावे. आपल्या शरीराला संपूर्ण दिवसासाठी निरोगी अन्नाची आवश्यकता असते. निरोगी नाश्त्याचे पर्याय निवडा. बरेच लोक त्यांचा नाश्ता वगळतात परंतु ही एक चांगली सवय नाही. सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण पोहे, उपमा, इडली घेऊ शकता.

एक कप चहा प्या

आपल्या दिवसाची सुरुवात एका कप चहाने केली तर तुम्हाला ताजेतवाने वाटते. तुम्ही ग्रीन टी किंवा तुमच्या आवडीचा कोणताही पर्याय निवडू शकता. चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे तुम्हाला आजारांपासून वाचवते आणि तुम्हाला ऊर्जा देते. तसेच पचनाला प्रोत्साहन देते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these tips to stay fresh throughout the day)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.