Health Tips: रात्र पाळीत काम करताना आरोग्य नीट ठेवण्यासाठी ‘हे’ करा आणि तंदुरुस्त राहा!
सध्या प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल झाले आहेत. अगोदर लोक दिवसभर आॅफिसचे काम करत होते. मात्र, आता नाईट शिफ्टमध्ये देखील आॅफिसचे काम करावे लागते
मुंबई : सध्या प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल झाले आहेत. अगोदर लोक दिवसभर आॅफिसचे काम करत होते. मात्र, आता रात्र पाळीमध्ये देखील आॅफिसचे काम करावे लागते. रात्र पाळीमध्ये काम केल्यामुळे आपली जीवनशैलीही बदलते. आपण आपल्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष देऊ शकत नाही, यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. (Follow these tips when working night shifts)
यामुळेच बऱ्याच लोकांचे रात्र पाळी केल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. बर्याच अभ्यासांमध्ये असा दावा केला आहे की, रात्र पाळीमध्ये काम केल्याने आरोग्याशी संबंधित आजार वाढतात. परंतु आपल्या जीवनशैलीत बदल करुन आपण आजारांना टाळू शकता. रात्र पाळीमध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपण नेमके काय केले पाहिजेत. हे आज आपण बघणार आहोत.
भरपूर झोप घ्या
कामानंतर दिवसभर झोप घ्या. झोपेनंतर आपण ताजेतवाने व्हाल आणि आपल्याला फ्रेश झाल्यासारखे वाटेल. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर बर्याच समस्या उद्भवू शकतात. या समस्या टाळण्यासाठी दिवसा 7 ते 8 तासांची संपूर्ण झोप घ्या.
जंक फूड खाऊ नका
बरेच लोक रात्र पाळीमध्ये काम करताना बाहेर जंक फूड खातात. पण अशी चूक करू नका. रात्री काम करताना हेल्दी अन्न खा. अशा गोष्टी खाल्ल्याने तुमचे पोटही भरले जाईल आणि सतत भूक देखील लागणार नाही.
फळे खा
रात्र पाळीमध्ये काम करण्यासाठी फळांचे सेवन करावे. यामुळे शरीरात उर्जा कायम राहते. याशिवाय जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहील. हंगामी फळे खाणे आरोग्यदायी असतात. या गोष्टी आपल्याला उर्जा देतील आणि तंदुरुस्त देखील ठेवतील.
चहा आणि कॉफीचे सेवन कमी करा
रात्री काम करण्यासाठी लोक चहा आणि कॉफीचा सहारा घेतात. पण जास्त चहा आणि कॉफी पिणे टाळावे. जास्त चहा किंवा कॉफी आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याऐवजी आपण हर्बल चहा आणि ग्रीन टी घेऊ शकता.
व्यायाम करा
रात्रीच्या शिफ्टमध्ये काम केल्यामुळे बहुतेक लोक व्यायाम आणि शारीरिक हालचाली करणे टाळतात. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. जर आपण जास्त व्यायाम करू शकत नाही तर अर्धा तास चाला.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Papaya | केवळ पपईच नव्हे तर, पपईच्या बियादेखील आरोग्यवर्धक, जाणून घ्या याचे फायदे…https://t.co/45NyovSpYE#Papaya #PapayaSeeds #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 24, 2020
(Follow these tips when working night shifts)