वजन कमी करण्यासाठी ‘हा’ डाएट फाॅलो करा, आठ दिवसांमध्ये वजन घटवा!

आपणही लठ्ठपणामुळे त्रस्त असल्यास, ही बातमी खास आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला एक खास डाएट प्लॅन सांगणार आहोत.

वजन कमी करण्यासाठी 'हा' डाएट फाॅलो करा, आठ दिवसांमध्ये वजन घटवा!
वजन कमी करण्यासाठी खास प्लॅन
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 2:56 PM

मुंबई : आपणही लठ्ठपणामुळे त्रस्त असल्यास तर ही बातमी खास आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला एक खास डाएट प्लॅन सांगणार आहोत. जो तुम्ही फाॅलो करून झटपट आपले वाढलेले वजन कमी करू शकता. विशेष म्हणजे हा डाएट फाॅलो केल्यानंतर आठ दिवसांमध्ये आपल्याला मोठा फरक जाणवेल. चला तर बघूयात मग हा नेमका कोणता डाएट प्लॅन आहे. (Follow this diet plan to lose weight)

आहारात याचा समावेश करा

वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, आपण काय खातो आणि काय पितो. वजन कमी करण्यासाठी आपण आपल्याला आहारात, ज्वारी, तपकिरी तांदूळ, डाळी, चना, मटकी आणि इतर सर्व कडधान्य घेतली पाहिजेत. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

हिरव्या भाज्या

वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात.

गोड खाणे टाळा

अनेकजणांना गोड खाण्याची इच्छा असते. मात्र, साखर खायची नाही, म्हणून ते मधासारखे पर्यायी पदार्थ शोधतात. असे लोक साखरेपेक्षा नैसर्गिकरित्या आढळणारे गोड पदार्थ चांगले आहे असं समजतात. मात्र, वास्तवात अशा गोड पदार्थांमध्ये कोणतेही अतिरिक्त पोषणद्रव्ये नसतात. शिवाय कॅलरिजचं प्रमाण देखील कमी नसतं. त्यामुळे साखर खाण्याऐवजी मध किंवा इतर गोड पदार्थ खाल्याने तसा काहीही फरक पडत नाही.

हेल्दी आहार

सकाळचा नाश्ता ते दुपारच्या जेवणादरम्यान फळं, नारळाचे पाणी, रस, ताक असे काहीतरी सेवन करा. दुपारच्या जेवणात प्रथम सलाड खा. त्यानंतर डाळ, 2 चपात्या आणि हिरव्या भाज्या खा. चपाती बार्ली, हरभरा आणि गव्हाचे पीठ यांच्या मिश्रणाची असावी. चपातीसाठी मका, गहू, बाजरी हे त्या-त्या हंगामाप्रमाणे बदला. दुपारच्या जेवणानंतर चहा किंवा ग्रीन टी घ्या. रात्रीचे जेवण हलके असावे. त्यात हिरव्या भाज्या आणि चपाती यांचा समावेश करा.

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Follow this diet plan to lose weight)

'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.