हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवायचं? मग झटपट तयार करा ‘हे’ सूप 

हिवाळ्यात लिंबू आणि ब्रोकोलीचे सूप प्यायल्याने आपल्या शरीराला उष्णता मिळते. यामुळे वजनही सहज कमी होते. थंडीच्या दिवसात निरोगी राहायचं असेल तर हे सूप चांगलं आणि मोजकं ठरू शकतं. हे बनवायलाही खूप सोपं आहे.

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवायचं? मग झटपट तयार करा 'हे' सूप 
हिवाळ्यात प्या गरमागरम सूप
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 11:42 AM

हिवाळा ऋतू सुरु झाला असून या ऋतूत शरीराला पोषण देणे आवश्यक असते. थंडीच्या दिवसात अनेकजण आपल्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतात. या दिवसांमध्ये शरीराला उबदार ठेवण्यासाठी आपण आपल्या रोजच्या आहारात गरम पदार्थांचे सेवन करत असतो. तर काहीजण अशावेळी सूप चे प्रकार करत असतात. तुम्ही सुद्धा तुमच्या आहारात लिंबू आणू ब्रोकोलीचे सूप बनवून पिऊ शकतात. कारण लिंबू आणि ब्रोकोलीचे सुप पोषक तत्वांनी समृद्ध आहे त्याचबरोबर चवीला देखील उत्तम लागते. या सुपाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असे पोषक तत्व मिळतात. याने रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊयात या सूपच्या रेसिपीबद्दल.

लिंबू आणि ब्रोकोली सूप तयार करण्यासाठी साहित्य

  • १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल
  • १ वाटी ब्रोकोली
  • २ कप पाणी
  • १ लिंबू
  • चवीनुसार मीठ आणि काळी मिरपूड
  • १/२ टीस्पून आले
  • २ लसूण पाकळ्या

लिंबू ब्रोकोली सूप बनवण्याची सोपी पद्धत

  • सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करावे. आता त्यात चिरलेले आले आणि लसूण घालून छान परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात चिरलेली ब्रोकोली घालून थोडा वेळ शिजवण्यासाठी झाकून ठेवावे.
  • आता कढईत पाणी घालून उकळू द्या.
  • ब्रोकोली पूर्ण शिजल्यावर मिक्सरमध्ये टाकून चांगले वाटून घ्यावे. तुम्हाला हवे त्यापद्धतीने बारीक वाटून घेऊ शकता.
  • आता पुन्हा कढईत बारीक वाटलेली ब्रोकोलीची पेस्ट घाला.
  • त्यानंतर त्यात लिंबाचा रस, मीठ, काळी मिरी घालून चांगले मिक्स करावे.
  • सूप पुन्हा एकदा उकळून घ्या. यानंतर गरमागरम लिंबू ब्रोकोली सूप सर्व्ह करा.

हिवाळ्यात लिंबू ब्रोकोली सूप पिण्याचे फायदे

  • थंडीत सर्दी, फ्लू सारख्या समस्या उद्भवू लागतात. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हे सूप पिऊ शकता. खरं तर ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे घटक असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराला आजारांशी लढण्यास मदत करते.
  • या सूपमध्ये कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
  • ब्रोकोलीमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे गॅस्ट्रिकची समस्या कमी होते आणि पोट स्वच्छ राहते.
  • लिंबू आणि ब्रोकोली दोन्हीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. यामुळे तुमची त्वचा चमकदार होते आणि दीर्घकाळ हायड्रेटेड राहते.
  • हिवाळ्यात लिंबू आणि ब्रोकोली शरीराला उबदार ठेवतात. यामुळे हिवाळ्यातही तुम्हाला फ्रेश वाटते.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.