AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FOOD | संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटामिन सी असणारे ‘हे’ पदार्थ, आहारात आवर्जून करा समावेश!

बदलत्या हंगामात थंडी-सर्दी आणि ताप यासारखे आजार टाळण्यासाठी आपल्या सर्वांना व्हिटामिन सी (Vitamin C) समृद्ध संत्री खाण्याचा सल्ला दिला जातो.

FOOD | संत्र्यापेक्षाही जास्त व्हिटामिन सी असणारे ‘हे’ पदार्थ, आहारात आवर्जून करा समावेश!
व्हिटामिन सी
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 4:34 PM

मुंबई : बदलत्या हंगामात थंडी-सर्दी आणि ताप यासारखे आजार टाळण्यासाठी आपल्या सर्वांना व्हिटामिन सी (Vitamin C) समृद्ध संत्री खाण्याचा सल्ला दिला जातो. आपण संत्रा देखील रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी संत्रे खात असाल किंवा संत्र्याचा रस पीत असाल. यामागील मुख्य कारण म्हणजे ताप आणि सामान्य सर्दी होण्यापासून व्हिटामिन सी रोखू शकत नाही. परंतु, या आजारांची लक्षणे तीव्र होण्यापासून रोखता येऊ शकतात आणि त्याचबरोबर आजारपणाचा कालावधी देखील कमी होतो. हेल्थ डॉट कॉमच्या मते, मध्यम आकाराच्या संत्र्यामध्ये केवळ 70 मिलीग्राम ‘व्हिटामिन सी’ असते. संत्र्या व्यतिरिक्त असे बरेच पदार्थ आहेत, ज्यात संत्र्यापेक्षा जास्त ‘व्हिटामिन सी’ असते (Foods that have more Vitamin C than oranges).

लाल, पिवळी आणि हिरवी शिमला मिरची

एका संत्र्यातत फक्त 70 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, मात्र बारीक चिरलेल्या 1 कप लाळ शिमला मिरचीमध्ये 190 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, जो संत्र्यापेक्षा तीन पट जास्त आहे. तर, पिवळ्या आणि हिरव्या शिमला मिरचीमध्ये 120 मिलीग्राम व्हिटामिन सी आहे. याशिवाय शिमला मिरची, जिला बेलपेपर्स म्हणून देखील ओळखले जाते, त्यात व्हिटॅमिन ए देखील भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

किवी

किवी फळ या दिवसांत प्रचंड लोकप्रिय झाले आहेत आणि त्याला भारतातही जास्त मागणी आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, किवीमध्ये 173 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, जो संत्र्यापेक्षा दुप्पट आहे. व्हिटामिन सी व्यतिरिक्त व्हिटामिन के, पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे आणि आहारातील फायबर देखील किवीमध्ये आढळतात. या व्यतिरिक्त कीवी अँटि-ऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत आहे. म्हणून केवळ प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठीच नव्हे, तर एकूण आरोग्यासाठी देखील किवी खूप फायदेशीर आहे (Foods that have more Vitamin C than oranges).

ब्रोकोली

ब्रोकोली देखील ‘व्हिटामिन सी’चा चांगला स्रोत आहे. ब्रोकोलीच्या 1 कपमध्ये सुमारे 132 मिलीग्राम व्हिटामिन सी आढळतो आणि त्याच वेळी, कॅलरी 30 पेक्षा कमी आणि केवळ 5 ग्रॅम कार्ब असतात, तर चरबी अजिबात नसते. फायबर देखील त्यात समृद्ध प्रमाणात असते. बर्‍याच संशोधनात हे देखील सिद्ध झाले आहे की, अशा बरीच नैसर्गिक संयुगे ब्रोकोलीमध्ये आढळतात, जी कर्करोगाच्या पेशी शरीरात वाढण्यास प्रतिबंध करतात.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीला बर्‍याच लोकांनी सुपरफ्रूट देखील म्हटले आहे. 1 कप स्ट्रॉबेरीमध्ये सुमारे 85 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. याव्यतिरिक्त त्यात हेल्दी फोलेट आणि अँटीऑक्सिडेंट देखील आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. याशिवाय स्ट्रॉबेरी खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे ती नैसर्गिक पद्धतीने आपले दात पांढरे करण्यात मदत करते.

अननस

अननसमध्ये 80 मिलीग्राम व्हिटामिन सी असते. याशिवाय त्यात ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम आढळते, जे अन्न खाल्ल्यानंतर पोट फुगी आणि आपचनापासून दूर राहण्यात देखील मदत करते.

(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Foods that have more Vitamin C than oranges)

हेही वाचा :

Nilgiri Oil | नीलगिरीच्या तेलाचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या कशा प्रकारे वापर कराल…

Raisins | दररोज प्या मनुक्याचे पाणी, शरीराला होतील ‘हे’ जबरदस्त फायदे!

पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.