Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिळाच्या चिक्कीचे सहा फायदे ठेवतील तुम्हाला तंदुरुस्त, हिवाळ्यात ऊर्जेचा स्त्रोत

साधारणत: चिक्की ही आपण कधी ना कधी सर्वांनीच खाल्लेली असेल. तीळ, खोबरं, शेंगादाना आदींपासून तयार चिक्कीला प्रचंड पसंती देण्यात येत असते. यातील विशेषत: तिळाची चिक्की ही शरीरात अनेक चमत्कारीक बदल घडवून आणते. थंडीच्या दिवसांमध्ये ही तुम्हाला उर्जित करुन ठेवत असते.

तिळाच्या चिक्कीचे सहा फायदे ठेवतील तुम्हाला तंदुरुस्त, हिवाळ्यात ऊर्जेचा स्त्रोत
गजक
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 8:11 AM

मुंबई – आरोग्याबाबत नेहमीच जागरुक असलेल्या व्यक्तींकडून (Healthy Diet) आपल्या आहारात नेहमी सकस पदार्थांचा समावेश करण्यात येत असतो. लठ्ठपणा, मधुमेह आदी व्याधी टाळण्यासाठी अनेक जण मिठाईसारख्या (Sweet) साखरेपासून तयार करण्यात आलेल्या गोड व्यंजनांपासून दोन हात लांब राहणेच पसंत करीत असतात. साखरेपासून तयार पदार्थांच्या अतिरेकाने आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होत असले तरी असा एक गोड पदार्थ ज्याचे तुमच्या आहारात असणे शरीराला फायद्याचे ठरते, तो म्हणजे चिक्की. तीळ व गुळापासून बनलेली चिक्की (Gajak) ही तुमच्या शरीराला फायद्याची ठरु शकते. तिच्या सेवनाने शरीराला असे काही फायदे होतात जे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, चला तर मग असे सहा फायदे जे तुमच्या शरीराला ठेवलीत निरोगी…

त्वचेचा पोत सुधारतो

तजेलदार त्वचेसाठी तिळाची चिक्की फायद्याची ठरु शकते. वाढते वय व प्रदुषणामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर सहज दिसून येतो. त्वचा काळी पडणे, सुरकुत्या, वळखण आदी समस्यांमुळे आपण नेहमीच चिंतेत असतो. अनेक वेळा अकाली आलेले म्हातारपण हीसुध्दा एक मोठी समस्या आहे. यावर तिळाची चिक्की फायदेशीर ठरू शकते. तिळात झिंक, सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात त्यामुळे त्वचेचा दर्जा सुधारण्यात मदत होत असते.

हाडांच्या मजबुतीसाठी लाभदायक

वाढत्या वयाबरोबर हाडे ठिसूळ होऊ लागतात. या वेळी अनेकांकडून कॅल्शियमची कमतरता असल्याचे सांगत कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देण्यात येत असतो. यामुळे हाडे मजबूत होतात. हाडांच्या मजबुतीसाठी तिळाच्या चिक्कीचा आहारात समावेश करता येउ शकतो. गूळ आणि तीळ वापरून तयार केलेली चिक्की ही कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहेत.

उच्च रक्तदाबाची समस्या दूर

ज्यांना उच्च रक्तदाबाची समय्या आहे, अशांसाठी तिळाची चिक्की अतिशय गुणकारी ठरते. उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या आहे. अनेक जण या समस्येपासून त्रस्त आहेत. परंतु आपल्या घरातील पदार्थांच्या वापरातून तुम्ही यावर बरेच नियंत्रण मिळवू शकतात. तिळाच्या चिक्कीत ‘सेसमोलिन’ नावाचा गुणधर्म असतो, जो रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम उत्तम पध्दतीने करतो.

पचनक्रिया सुधारण्यात मदत

तुमची पचनक्रीया सुधारण्यात फायबरचे मोठे योगदान असते. अनेक फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने ती आपल्या शरीराला पचायला देखील सोपी असतात. रोजच्या जेवनात फायबरचा वापर केल्यास आपली पचनक्रीया सुधारते व रक्ताभिसरणही उत्तम होते. तिळाच्या चिक्कीतदेखील फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते. तिळाची चिक्की तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम देते.

ऊर्जेचा स्त्रोत

धावपळीच्या जगात अनेकदा थकवा जाणवत असतो किंवा उर्जा कमी झाल्यासारखे वाटत असते या सर्व समस्यांवर चिक्की तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकते. चिक्की ही तीळ व गुळापासून तयार केली जाते जे तुम्हाला झटपट ऊर्जा देते. याशिवाय थकवा दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

भरपूर प्रमाणात लोह

गुळ व तिळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते, जे लाल रक्त पेशी तयार करण्याचे काम करते आणि अॅनिमियापासून लांब ठेवते शिवाय चिक्कीच्या सेनामुळे अशक्तपणाही दुर होत असल्याने हे शरीरासाठी लाभदायक ठरते.

संबंधित बातम्या :

Skin care : त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असते दूध, जाणून घ्या कोणी वापर करु नये?

Beauty tips: केसगळती आणि कोंडा यापासून सुटका देईल कढीपत्ता! जाणून घ्या सोपे घरगुती उपाय

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.