आल्याचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या आल्याचा चहा करण्याची योग्य पद्धत

आल्याशिवाय चहा अपूर्णच असतो. आल्याचा चहा हिवाळ्यात जवळपास सगळ्यांनाच आवडतो. हा चहा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आल्याच्या चहामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

आल्याचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या आल्याचा चहा करण्याची योग्य पद्धत
आल्याचा चहा
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 10:44 AM

How to make Ginger Tea : आपल्याकडे चहा न आवडणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. बहुतेक लोकांना चहा प्यायला आवडतो ऋतू कोणताही असो, लोक दिवसभरात दोन चार कप चहा सहज पितात. सकाळी एका कप चहा पीला तर चैतन्य आल्या सारखे वाटते.चहा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो.

लोक अनेक प्रकारचे चहा तयार करतात आणि पितात. काही लोकांना वेलची टाकलेला चहा आवडतो तर काहींना आल्याच्या चहाचे वेड असते. लोक हिवाळ्यात आल्याचा चहा अगदी आवर्जून पितात कारण त्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे इत्यादी समस्यांचा त्रास कमी होतो.याशिवाय आले गरम असते.म्हणून हिवाळ्यात आल्याचा चहा मोठ्या प्रमाणात पिला जातो. अनेकदा लोक आल्याचा चहा बनवतात पण त्याची चव तितकीशी चांगली नसते. काही वेळा लोक जास्त आले चहामध्ये टकतात त्यामुळे चहाला कडूच चव येते. यासाठी चहा करताना त्यामध्ये अद्रक किती प्रमाणात टाकावी याची माहिती असणे गरजेचे आहे.

आल्याचा चहा बनवण्याची योग्य पद्धत

बहुतेक लोक अद्रक चहाला प्राधान्य देतात. हा चहा बनवताना काही लोक चहाच्या भांड्यात एकाचवेळी दूध, साखर, चहापत्ती, आले,आणि पाणी टाकतात. पण तुम्ही सुद्धा ही चुकी करत असाल तर अजिबात करू नका. सर्व गोष्ट एकत्र टाकल्याने चहा चांगला होत नाही. सर्वप्रथम एका भांड्यात पाणी, दूध आणि साखर घालून उकळू द्या. आले सोलून त्याचे छोटे तुकडे करा काही लोक आले इतक्या बारीक कुस्करतत की त्याचा रस भांड्याबाहेर राहतो. पाणी, दूध आणि साखरेला उकळी आल्यानंतर त्यात आले टाकून एक मिनिटे उकळू द्या.

आल्याचा रस भांड्यात राहिल्यास चहाला पूर्ण चव येत नाही. आल्याचे तुकडे करण्या व्यतिरिक्त तुम्ही आले किसून देखील चहा मध्ये टाकू शकता. चहामध्ये अद्रक किसून टाकल्याने तो उकळल्यानंतर आल्याचा अर्क चहा मध्ये चांगल्या पद्धतीने मिसळतो. त्यानंतर त्यामध्ये चहापत्ती टाका आणि आणखीन एक ते दोन मिनिटे चहा उकळू द्या. तुम्ही किती कप चहा बनवणार आहात त्यानुसार प्रत्येक गोष्टीचे प्रमाण ठरवा.

आल्याचा चहा पिण्याचे फायदे

आले हे उष्ण असते. त्यामुळे हिवाळ्यात त्याचे सेवन करणे फायदेशी ठरेल. आल्याचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे हिवाळ्यात अनेक आजारांपासून बचाव होतो. सर्दी, खोकला आणि घसा खवखवल्यास आल्याचा चहा प्या. संसर्गाशी लढण्यास हा मदत करतो कारण आल्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. पचनक्रिया व्यवस्थित राहते.वेदना आणि सूज बरी होते. तसेच उलटी आणि मळमळ होण्याचे समस्या देखील दूर होते.

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.