रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काकडी, लिंबू, पालक आणि लसणाचा ज्यूस अत्यंत फायदेशीर, वाचा !
सध्याच्या कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
मुंबई : सध्याच्या कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत आवश्यक झाले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोनाच काय दुसरा कोणताही आजार आपल्याला होऊ शकत नाही. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. (Green juice is beneficial for boosting the immune system)
यासाठी आपल्याला लिंबू, हिरवी कोबी, हिरवे सफरचंद, काकडी, हिरव्या भाज्या, आले, पालक, टोमॅटो, बीट, लसूण, कारले यापैकी कोणत्याही चार-पाच गोष्टी लागणार आहेत. रस बनवण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी बारीक चिरून घ्या आणि गरजेनुसार त्यात पाणी टाकून, मिक्सरच्या मदतीने ‘हेल्थी ज्यूस’ तयार करा. कारले, हिरवे सफरचंद, काकडी, लिंबू, पालक, टोमॅटो आणि लसूण यासारख्या निरोगी वस्तूंपासून बनवलेले हा रस व्हिटामिन-ए, व्हिटामिन-सी, व्हिटामिन-के आणि लोहाचा चांगला स्रोत आहे. यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध, हा ‘ग्रीन ज्यूस’ आपल्याला अनेक हानिकारक आजारांपासून वाचवतो. त्याच वेळी, हा रस आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवतो आणि दिवसभर आपली ऊर्जा देखील वाढवतो. याचबरोबर शरीरात चयापचय क्रिया देखील सुरळीत करतो. हा ज्यूस आपण दिवसातून एकदातरी घेतला पाहिजे. कारले आणि बीट आपले रक्त शुद्ध करते, हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. परंतु या रसातील कारले आणि बीट याशिवाय हिरवे सफरचंद, काकडी, लिंबू, आले, लसूण आणि टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणात आहेत.
वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात. आपल्या दिवसाची सुरुवात हिरव्या पालेभाजीच्या सुपने केली पाहिजे.
संबंधित बातम्या :
Diet Plan | मधुमेहाच्या रुग्णांसाठी कसा असावा आहार? जाणून घ्या या डाएट प्लॅनविषयी…#DietPlan | #diabetes | #Food | #health https://t.co/IiRsa0ZZhZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 19, 2021
(Green juice is beneficial for boosting the immune system)