Health Care : सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका अन्यथा ‘या’ समस्यांना सामोरे जावे लागेल!

सकाळचा नाश्ता करण्यास टाळाटाळ करणे म्हणजे आपल्या आयुष्यातील एखाद्या दिवस सोडण्यासारखेच आहे. सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभराची ऊर्जा देते. तंदुरुस्त आणि सशक्त राहण्यासाठी दररोज निरोगी आणि पौष्टिक नाश्ता घेणे खूप महत्वाचे आहे.

Health Care : सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका अन्यथा 'या' समस्यांना सामोरे जावे लागेल!
नाश्ता
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 11:41 AM

मुंबई : सकाळचा नाश्ता करण्यास टाळाटाळ करणे म्हणजे आपल्या आयुष्यातील एखाद्या दिवस सोडण्यासारखेच आहे. सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभराची ऊर्जा देते. तंदुरुस्त आणि सशक्त राहण्यासाठी दररोज निरोगी आणि पौष्टिक नाश्ता घेणे खूप महत्वाचे आहे. सकाळी आॅफिसला जाण्याच्या गडबडीत आपल्याकडे वेळ नसेल तर काही फळे खा. ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल. (Have breakfast every morning and stay healthy)

निरोगी आणि संतुलित आहार घेऊन प्रतिकारशक्ती बळकट करता येते आणि रोगांपासून दूर राहणे देखील शक्य होते. आपल्या शरीरासाठी निरोगी अन्न जितके आवश्यक आहे, तितकेच ते वेळच्यावेळी खाणे देखील आवश्यक आहे. जर तुम्ही चुकीच्या सवयींचे अनुसरण करीत असाल तर, त्या बदलण्याची आवश्यकता आहे. बरेच लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता करणे टाळतात.

ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. जर आपण सकाळी नाश्ता नाही केला तर चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा येणे, डोकेदुखी यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रथिने, कार्बोदके व साखर यांचे प्रमाण संतुलित असावे. फळे, भाज्या यांचा आहारात शक्यतो समावेश करावा. आहारात नैसर्गिक भाजीपाला, फळे, धान्य यांचा वापर करावा. सकाळी एक चमचा गायीचे तूप व एक कप गायीचे दूध घेणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला दिवसाची सुरुवात हेल्दी नाश्त्याने करायची असेल तर, पनीर भुर्जी हा एक उत्तम पर्याय आहे. आपण पनीरमध्ये टोमॅटो, कांदा, शिमला मिरची टाकून त्याची भुर्जी बनवू शकता. या पनीर भुर्जीबरोबर मल्टीग्रेन ब्रेड खाऊ शकता. आपल्या सर्वांना माहित आहे की, अंड्यांमध्ये सर्वाधिक प्रथिने असतात. आपण त्यांना उकडून किंवा त्याची पोळी बनवून ब्रेडसह खाऊ शकता. अंड्यांमध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असते.

घाईघाईत आपण पटापट अन्न खातो. यामुळे बर्‍याचदा घरातील वडीलधारी आपल्याला बोल लावतात आणि अन्न नीट चावून खाण्यास सांगतात. अन्न नीट चावून खाल्याने पचन चांगले होते. अन्न न चावता, पटापट गिळले, तर ते शरीरात चरबी म्हणून साठते आणि शरीराला योग्य प्रमाणात पोषणद्रव्ये मिळत नाहीत. म्हणून सर्वांनी अन्न नीट चावून खाल्ले पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Have breakfast every morning and stay healthy)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.