वजन वाढतंय म्हणून सकाळचा नाश्ता बंद करू नका; नाही तर…

सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण व्यायाम करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाहीत.

वजन वाढतंय म्हणून सकाळचा नाश्ता बंद करू नका; नाही तर...
सकाळचा नाश्ता
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 7:00 AM

मुंबई : सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण व्यायाम करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाहीत. यामुळे अनेकांचे वजन वाढत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जात आहेत. मात्र, म्हणावे तसे वजन कमी होत नाही. मग अनेकजण वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता करणे बंद करतात. अनेकांना असे वाटते की, सकाळचा नाश्ता नाही केला तर आपले वजन नियंत्रणात राहिलं. मात्र, सकाळचा नाश्ता आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक महत्वाचा असतो. (Having breakfast is good for your body)

नाश्ता टाळणे शरीरासाठी घातक कित्येकदा वजन वाढतेयं म्हणून सकाळचा नाश्ता करणे अनेकजण टाळतात. पण त्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. हल्ली उपाशी राहण्याची क्रेझ आली आहे. मात्र यामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतात. जर आपण सकाळचा नाश्ता योग्य वेळी केला नाही, तर आपली स्मरणशक्तीही कमी होऊ लागते.

कारण झोपेनंतर मेंदूत ग्लुकोजचं प्रमाण कमी होते. सकाळचा नाश्ता हा आपल्या मेंदूला पर्यायी ग्लुकोज पुरवत असतो. जेणेकरून आपण आपल्या दिवसाची सुरूवात एका जोशात आणि नव्या उर्जेने करु शकतो. जे लोक नियमितपणे नाश्ता करतात त्यांच्या शरीरात प्रमाणबद्ध वजन, साखरेचं योग्य प्रमाण, उत्तम मन:स्वास्थ्य, एकाग्रता असते.

नाश्त्यामध्ये नेमके घटक असावेत? सकाळच्या नाश्त्यात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ, कबरेदके इत्यादी घटकांचा समावेश असावा.

– आपल्या आहारात तंतू असणं हे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर आजारांना लांब ठेवण्यासाठीही गरजेचं आहे.

-अंडी, मासे, दूध इत्यादी पदार्थात प्रथिनं असतात. उकडलेलं अंड किंवा अंडयातील चरबी नसलेले पदार्थ तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता.

-धान्यातून आणि संपूर्ण धान्याच्या ब्रेडमधूनही संमिश्र कार्बोदके मिळतात. त्यातून शरीराला आवश्यक पोषण मिळते.

-आपल्या शरीरासाठी पाणी फार गरजेचे आहेत. पाणी योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने, योग्य वेळी पिण्याचे फार महत्त्व आहेत. त्यामुळे दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…

(Having breakfast is good for your body)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.