Health care tips : वजन कमी करण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत दुधी भोपळा आरोग्यासाठी फायदेशीर!
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात पाणीयुक्त पदार्थांचे सेवन करणे चांगले. दुधी भोपळा रोगांपासून बचाव करण्यासोबतच तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत होते. यामुळे या हंगामामध्ये दुधी भोपळ्याचा आहारामध्ये नक्की समावेश करा.
मुंबई : दुधी भोपळा खायला फार कमी लोकांना आवडतो. मात्र, हा दुधी भोपळा खाणे आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप जास्त फायदेशीर आहे. दुधी भोपळ्यामध्ये 90 टक्के पाणी असते, ज्यामुळे या हंगामामध्ये त्याचे सेवन अधिक फायदेशीर (Beneficial) ठरते. दुधी भोपळ्यामध्ये फायबर देखील असते. पोट, हृदय आणि इतर आरोग्य फायद्यांसाठी दुधी भोपळ्याचे सेवन केले पाहिजे. हे वजन कमी (Weight loss) करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करते. दुधी भोपळ्यापासून बनवलेल्या भाजीचे सेवन रात्री किंवा दुपारी करू शकता. दुधी भोपळ्याचा रस घेणे देखील शरीरासाठी फायदेशीर ठरते. चला तर मग जाणून घेऊयात दुधी भोपळा खाण्याचे फायदे.
दुधी भोपळा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर…
- दुधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन B, C, A असते. लोह आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात. दुधी भोपळ्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते. त्यात फायबर जास्त असते. हे पचनसंस्थेला निरोगी ठेवते, वजन कमी करण्यास मदत करते. आपण जर दुधी भोपळ्याचा रस आहारामध्ये घेतला तर वजन कमी होण्यास मदत होते.
- उन्हाळ्याच्या हंगामामध्ये दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात पाणीयुक्त पदार्थांचे सेवन करणे चांगले. दुधी भोपळा रोगांपासून बचाव करण्यासोबतच तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत होते. यामुळे या हंगामामध्ये दुधी भोपळ्याचा आहारामध्ये नक्की समावेश करा.
- दुधी भोपळ्यामध्ये पोटॅशियम असते. ते रक्तदाब नियंत्रित करते. यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होते. हा बँड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे रक्तदाब नियमित राहतो. दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यात आहारातील फायबर असते, त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
- विशेष म्हणजे आपल्या त्वचेसाठीही दुधी भोपळा खूप जास्त फायदेशीर आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचा चमकदार राहते. चांगल्या झोपेसाठी तुम्ही दुधी भोपळ्याचा रस सेवन करू शकता. यामुळे झोप न लागण्याची समस्या दूर करण्यास मदत होते.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या : Weight loss : सब्जा आणि दह्याच्या स्मूदीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते!
Hair | मऊ आणि चमकदार केस मिळवण्यासाठी हे 3 हेअर मास्क केसांसाठी अत्यंत फायदेशीर!