आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी सत्तू फायदेशीर, जाणून घ्या त्याचे 5 फायदे!
उन्हाने (Summer) आता चांगलाच जोर धरला आहे. तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. कडाक्याच्या उन्हाने त्वचा खराब होण्यास सुरूवात झाली आहे. उष्णता वाढल्याने शरीराच्या अनेक समस्या निर्माण होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई : उन्हाने (Summer) आता चांगलाच जोर धरला आहे. तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. कडाक्याच्या उन्हाने त्वचा खराब होण्यास सुरूवात झाली आहे. उष्णता वाढल्याने शरीराच्या अनेक समस्या निर्माण होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. या हंगामामध्ये आणि कडाक्याच्या उन्हामध्ये निरोगी (Healthy) राहण्यासाठी सत्तूचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर (Beneficial) आहे. रोज सत्तू प्यायल्याने तुमच्या शरीराला लोह, सोडियम, फायबर, लोह, मॅंगनीज, प्रथिने, मॅग्नेशियम असे अनेक पोषक तत्व मिळतील आणि शरीर उष्णतेपासून दूर राहण्यास मदत होईल.
सत्तू खाण्याचे नेमके कोणते फायदे होतात हे जाणून घेऊयात
- उन्हाळ्यात रोज सत्तू प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. शरीराचे तापमान नियंत्रित राहते. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. ते प्यायल्याने उष्माघातापासून बचाव होतो. कडक उन्हात बाहेर जाणार असाल तर सत्तूचा ग्लास पिऊन घराबाहेर पडावे.
- जेव्हाही तुम्ही बाहेरून याल आणि तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा जाणवेल तेव्हा तुम्ही सत्तूचे सेवन नक्कीच करा. हे तुमच्या शरीराला शक्ती देईल आणि उलट्या, मळमळ, चक्कर येणे, जुलाब इत्यादी उष्णतेमुळे होणाऱ्या सर्व समस्यांपासून दूर राहण्यास मदत होईल.
- सत्तूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ते पचनसंस्थेसाठीही खूप चांगले असते. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी इत्यादी होत नाहीत. तसेच फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने आपल्याला बऱ्याचवेळ भूक देखील लागत नाही.
- तुम्हाला वजन कमी करायचे असले तरी सत्तू तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये फायबर असते, ज्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरलेले वाटते. तुम्ही जास्त खाणे टाळा आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये सत्तूचे सेवन करावे.
- मधुमेहाच्या रुग्णांसाठी सत्तूचे सेवन करणे खूप जास्त फायदेशीर आहे. सत्तूमुळे शरीरातील रक्तातील साखरेची वाढती पातळी कमी होते. यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये सत्तूचा समावेश करायला हवाच.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संंबंधित बातम्या :
Skin care : त्वचेच्या या समस्या दूर करण्यासाठी कच्च्या हळदीचा एक तुकडाच फायदेशीर!
Non Stop LIVE Update