Health Care : कामापेक्षा जास्त जेवण केलं आहे? मग ‘या’ टिप्स फाॅलो करून आराम मिळवा!

खराब जीवनशैलीमुळे आजकाल लोकांना अनेक आजार जडत आहेत. त्यामुळे मधुमेह, थायरॉईड,कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, गुडघेदुखी अशा सर्व समस्या लहान वयातच होऊ लागल्या आहेत. जर आपण व्यवस्थित डाएट फाॅलो केला तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Health Care : कामापेक्षा जास्त जेवण केलं आहे? मग 'या' टिप्स फाॅलो करून आराम मिळवा!
आरोग्य
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 10:21 AM

मुंबई : खराब जीवनशैलीमुळे (Bad lifestyle) आजकाल लोकांना अनेक आजार जडत आहेत. त्यामुळे मधुमेह, थायरॉईड,कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, गुडघेदुखी अशा सर्व समस्या लहान वयातच होऊ लागल्या आहेत. जर आपण व्यवस्थित डाएट फाॅलो केला तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मात्र, बऱ्याच वेळा काही पदार्थ इतके जास्त स्वादिष्ट होतात की, ते खाण्यापासून आपण स्वत: ला रोखू शकत नाहीत. कधी कधी जास्त प्रमाणात अन्न खाल्ल्याने पोटदुखी किंवा इतर समस्याही उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे.

कोमट पाणी प्या

जास्त खाल्ल्यानंतर जडपणासोबतच जळजळ किंवा अॅसिडिटीचा त्रासही होतो. यापासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाणी प्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ घालू शकता. याचे सेवन केल्याने पोटातील जडपणापासून आराम मिळेल.

काळे मीठ

जास्त खाल्ल्यानंतर जडपणापासून आराम मिळण्यासाठी काळ्या मिठाचे पाणी प्या. हे करण्यासाठी थोडे पाणी गरम करा आणि त्यात काळे मीठ, जिरे यांसारख्या गोष्टी मिसळा आणि जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर हे पाणी प्या. यामुळे तुम्हाला खूप आराम वाटेल.

फिरायला जा

जास्त अन्न खाल्ल्यानंतर आपले पोट जड वाटते. अशावेळी आपण चालले पाहिजे. मात्र, एकदम फास्ट नका चालू हळूहळू चाला. यामुळे अन्न लवकर पचण्यास सुरूवात होते.

काकडी खा

फायबर समृध्द काकडी पचनसंस्थेसाठी उपयुक्त आहे. जेवल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी अर्धी काकडी कापून खा. यामुळे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात आराम मिळेल.

(टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या : 

Hair Care Tips: हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

Postpartum Care | बाळंतपणानंतरही पुन्हा सडपातळ व्हा, वजन नियंत्रणासाठी घरगुती उपाय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.