Health : उन्हाळ्यात या ज्यूस आणि स्मूदीचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहा!

उन्हाळ्याचा (Summer) हंगाम म्हटले की, कोल्ड ड्रिंक्स घरामध्ये येतात. मात्र, जास्त प्रमाणात बाहेरील कोल्ड ड्रिंक्स पिणे आरोग्यासाठी धोकादायकच असते. यापेक्षा या हंगामात आपण हेल्दी ड्रिंक्स (Healthy drinks) देखील घेऊ शकता. ते तुम्हाला उन्हाळ्यापासून आराम देण्याचे काम करते.

Health : उन्हाळ्यात या ज्यूस आणि स्मूदीचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहा!
उन्हाळ्याच्या हंगामात या ज्यूसचा आहारात समावेश करा. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 10:55 AM

मुंबई : उन्हाळ्याचा (Summer) हंगाम म्हटले की, कोल्ड ड्रिंक्स घरामध्ये येतात. मात्र, जास्त प्रमाणात बाहेरील कोल्ड ड्रिंक्स पिणे आरोग्यासाठी धोकादायकच असते. यापेक्षा या हंगामात आपण हेल्दी ड्रिंक्स (Healthy drinks) देखील घेऊ शकता. ते तुम्हाला उन्हाळ्यापासून आराम देण्याचे काम करते. यासोबतच हे तुम्हाला निरोगी ठेवण्यासही मदत करेल. उन्हाळ्यात तुम्ही आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचे रस किंवा स्मूदी यांचा समावेश करू शकता. लिंबू, काकडी आणि कलिंगड (Watermelon) यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. ते केवळ तुम्हाला हायड्रेटेड ठेवतीलच असे नाहीतर ते तुम्हाला दिवसभर उत्साही राहण्यास देखील मदत करतील.

संत्र्याचा रस

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, व्हिटॅमिन सी हे संत्र्यामध्ये जास्त प्रमाणात असते. तसेच व्हिटॅमिन सीमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. यामुळे सध्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये संत्री आणि लिंबाचा रस घेतला पाहिजे. मात्र, बाहेरून संत्र्याचा रस आणण्यापेक्षा घरीच संत्र्याचा रस तयार करा आणि प्या. यामुळे निरोगी राहण्यास मदत होईल.

आंब्याची स्मूदी

फळांचा राजा म्हणून आंब्याला ओळखले जाते. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आंबे खाण्यावर लोकांचा जास्तच भर असतो. दूध आणि आंब्याचा वापर करून तुम्ही मँगो स्मूदी बनवू शकता. त्यात भरपूर पोषक असतात. विशेष म्हणजे मँगो स्मूदी तुम्ही दिवसभरामधून कधीही पिऊ शकता. ही स्मूदी आरोग्यासाठी फायदेशीर असते.

स्ट्रॉबेरी स्मूदी

स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर फायबर असते. हे वजन कमी करण्यास मदत करतात. यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. हे तुम्हाला जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते. त्यात कॅलरीज कमी प्रमाणात असतात. स्ट्रॉबेरी स्मूदी केवळ स्वादिष्टच नाही तर पौष्टिक देखील आहे. यामुळेच सध्याच्या हंगामात स्ट्रॉबेरी स्मूदीचा आपल्या आहारामध्ये समावेश करा. वजन कमी करण्यासाठी या स्मूदीमध्ये साखर अजिबात टाकू नका. कारण स्ट्रॉबेरी अगोदरच गोड असते.

कलिंगडचा रस

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये बाजारामध्ये सहज मिळणारे आणि आरोग्यासाठी चांगले असणारे फळ म्हणजे कलिंगड हे आहे. कलिंगडमध्ये 90 टक्के पाणी असते. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते. कलिंगडचा रस प्यायल्यानंतर तुम्हाला हायड्रेटेड वाटेल. पॅकबंद ज्यूसऐवजी घरगुती ज्यूस वापरा. त्यात भरपूर पोषक असतात. हे पेय अतिशय आरोग्यदायी आणि चवदार आहे. विशेष म्हणजे कलिंगडाचा रस वजन झटपट कमी करण्यासही मदत करतो.

संबंधित बातम्या : 

Disadvantages : अंडी खाण्याचे शाैकिन आहात?, जाणून घ्या त्यामुळे होणारे नुकसान!

Weight loss Tips : जिऱ्याचे पाणी वजन कमी करते, मात्र या गोष्टींची विशेष काळजी घ्या!

अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.