Health Care : निरोगी राहण्यासाठी फक्त या 4 टिप्स फाॅलो करा आणि पाहा बदल!
निरोगी शरीर ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोनाच्या (Corona) काळामध्ये आपल्या सर्वांचाच आयुष्यामध्ये मोठे बदल झाले. आपल्या दररोजच्या जीवनशैलीमधील अनेक गोष्टी बदलल्या. वर्क फ्राम होमवर अनेक कंपन्यांनी भर दिला, त्यामुळे घराच्या बाहेर पडणे आता कमी झाले आहे.
मुंबई : निरोगी शरीर ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोनाच्या (Corona) काळामध्ये आपल्या सर्वांचाच आयुष्यामध्ये मोठे बदल झाले. आपल्या दररोजच्या जीवनशैलीमधील अनेक गोष्टी बदलल्या. वर्क फ्राम होमवर अनेक कंपन्यांनी भर दिला, त्यामुळे घराच्या बाहेर पडणे आता कमी झाले आहे. याचा आपल्या आरोग्यावरही (Health) वाईट परिणाम झाला आहे. शरीर निरोगी असेल तरच एकाग्रता वाढेल. जास्त फास्ट फूड खाणे, खूप तेलकट-मसालेदार पदार्थ (Food) खाणे, ताणतणाव, एकाच जागी बसून जास्त वेळ घालवणे, व्यायाम न करणे या सर्व गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायकच आहेत. निरोगी राहण्यासाठी नेमके काय करायला हवे हे आपण जाणून घेणार आहोत.
नाश्त्यामध्ये या पदार्थांचा समावेश असावा
नाश्ता हा आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. नाश्त्यामध्ये नेहमीच ताजे अन्न खा. रोजच्या नाश्त्यामध्ये पोहे, इडली, ढोसा, अंडी घा. यासोबतच काही हंगामी फळे खाणे आवश्यक आहेत. तसेच भिजवलेले बदाम आणि अक्रोड दिवसातून तीन वेळा खा. यामुळे आपल्या दिवसाची सुरूवात चांगली होण्यास मदत होईल.
जेवणामध्ये या पदार्थांचा समावेश करा
एक वाटी डाळ, एक वाटी भाजी पातळ, लोणचे, भात आणि पातळ दोन चपात्या हे आपल्या जेवणामध्ये असेल पाहिजे. तसेच फळे, कडधान्य, हिरव्या भाज्या, दूध हे आहारामध्ये घ्यावे. या अन्नामध्ये सर्वाधिक प्रथिने असतात. असा आहार जर आपण दररोजच्या जेवणामध्ये घेतला तर आपण नक्कीच निरोगी राहाल.
30 मिनिटांची झोप खूप महत्त्वाची
ज्यांना पचनाच्या समस्या आहेत, हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे, थायरॉईड-पीसीओएसचा त्रास आहे, अॅसिडिटीचा त्रास आहे, पचनाचा त्रास आहे किंवा निद्रानाशाचा त्रास आहे अशांसाठी ही 20-30 मिनिटांची झोप खूप महत्त्वाची आहे. यामुळे जर आपल्याला दुपारी थोडासा वेळ मिळत असेल तर थोडा वेळ नक्कीच झोप घ्या.
व्यायाम करा आणि निरोगी राहा
निरोगी राहण्यासाठी आहाराची ज्याप्रमाणे महत्वाची भूमिका आहे, तशीच व्यायामाची देखील आहे. व्यायाम करणे आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. आपण दिवसभरामधून कधीही व्यायाम करू शकतो. मात्र, सकाळी लवकर व्यायाम करणे अधिक फायदेशीर असते. कारण सकाळी व्यायाम केल्याने दिवसभर फ्रेस राहण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
जपानमधील मुलं सर्वाधिक निरोगी का असतात? समोर आले अचंबित करणारे कारण…
Health Care : दररोज केळी खाण्याचे जबरदस्त फायदे, हे आजार राहतील कायमचे दूर!