दिवसभरात किती भात खावा? पांढरा की ब्राऊन कोणते तांदूळ असतात अधिक पौष्टिक

पांढरा तांदूळ भारतात सर्वाधिक खाल्ला जातो. पण नेमके कोणत्या तांदळाचे सेवन अधिक आरोग्यदायी असते आणि त्याचे किती फायदे असतात, हे जाणून घेणे अधिक महत्वाचे आहे.

दिवसभरात किती भात खावा? पांढरा की ब्राऊन कोणते तांदूळ असतात अधिक पौष्टिक
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 11:42 AM

भात हे भारत देशातील प्रमुख अन्न मानले जाते. कुठल्याही प्रकारच्या भाजीबरोबर आपण भात खात असतो. तर आपल्यापैकी काही जणांना दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात फक्त भात खायला आवडतो. तुम्हालाही भात खाण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दिवसभरात तुम्ही किती भात खावा हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. याशिवाय पांढरा तांदूळ हेल्दी आहे की नाही, नसेल तर त्याशिवाय पर्याय काय असू शकतो, हेही जाणून घेणं गरजेचं आहे.

कोणता तांदूळ किती आरोग्यदायी?

पांढरा तांदूळ भरपूर ठिकणी सर्वाधिक प्रमाणात खाल्ला जातो. पांढऱ्या तांदळात कमी फायबर आणि पोषक असतात. पांढऱ्या तांदळाचे जास्त सेवन केल्याने रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. जर तुम्हाला नियमित भात खाण्याची आवड असेल तर तुम्ही तपकिरी लाल रंग असलेल्या तांदळाची निवड करू शकता. यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.

दिवसभरात किती भात खावा?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, दररोज 200-300 ग्रॅम भात खाण्याचा सल्ला दिला जातो. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) म्हणण्यानुसार, आपण दररोज 250-300 ग्रॅम भात खाऊ शकतात. अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) च्या मते, दररोज 100-150 ग्रॅम भात खाणे परिपूर्ण आहे.

बासमती तांदूळ

भारतात तांदळाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकजण आपापल्या नुसार तांदूळ घेत असतो. पण खास करून बासमती तांदूळ हा बिर्याणी, पुलाव बनवण्यासाठी वापरतात. बासमती हा तांदूळ सर्वात लांब आणि सुगंधी तांदूळ आहे. दक्षिण भारतात सोना मसुरी आणि पोन्नी तांदूळ सर्वात जास्त खाल्ला जातो. तर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात सोना मसूरी मोठ्या प्रमाणात पिकते. पोन्नी तांदूळ हलका असतो आणि मुख्यत: इडली आणि डोसा पीठ बनविण्यासाठी वापरला जातो.

लाल, काळा आणि तपकिरी तांदूळ

लाल तांदूळ केरळ, आसाम आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यांमध्ये आढळतो.हा लाल तांदूळ पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि पारंपारिक पदार्थांमध्ये वापरला जातो. याशिवाय भारतात काळा तांदूळही आहे, जो मणिपूरमध्ये पिकवला जातो. इथले लोक याला “चाखाओ” म्हणून ओळखतात. हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे त्याला विशेष बनवते. दुसरीकडे, तपकिरी तांदळात किंचित जास्त कॅलरी असतात. तथापि, यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त असतात, जे आपल्याला दीर्घकाळ उर्जेने परिपूर्ण ठेवते.

'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.