Weight Loss : वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात? तर ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा!
कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाल्यामुळे आता सर्व काही पूर्वीप्रमाणेच सामान्य होत आहे. कोरोनाच्या काळात आपल्या सर्वांच्या जीवनशैलीमध्ये मोठा बदल झाला होता. कोरोनाचा काळ जवळपास सर्वांसाठी खूप कठीण होता. कोरोनाच्या काळात सर्वत्र लाॅकडाऊन असल्यामुळे आपल्याला घराच्या बाहेर पडणे देखील शक्य नव्हते.
मुंबई : कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाल्यामुळे आता सर्व काही पूर्वीप्रमाणेच सामान्य होत आहे. कोरोनाच्या काळात आपल्या सर्वांच्या जीवनशैलीमध्ये मोठा बदल झाला होता. कोरोनाचा काळ जवळपास सर्वांसाठी खूप कठीण होता. कोरोनाच्या काळात सर्वत्र लाॅकडाऊन असल्यामुळे आपल्याला घराच्या बाहेर पडणे देखील शक्य नव्हते. (Here are 3 things to keep in mind when losing weight)
त्यामुळे व्यायाम, चालणे, जीम हे सर्वच बंद झाले. यामुळे या काळात सर्वांचेच वजन वाढले आहे. आता हे अतिरिक्त वजन कमी करणे एक कठीण काम झाले आहे. जर तुम्ही सुद्धा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर निरोगी मार्गाने वजन कमी करण्यासाठी तुम्ही तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
1. स्वतःला हायड्रेटेड ठेवा
स्वतःला हायड्रेटेड ठेवणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पाणी जास्त पिल्याने आपले वजन देखील कमी होऊ शकते. पुरेसे पाणी असणे तुम्हाला जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते आणि अशा प्रकारे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते. तज्ञांनी असे सुचवले आहे की, दररोज किमान 2.5 लिटर पाणी प्यावे. पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेटेड राहते. यामुळे तुमचा चेहरा चमकदार आणि तजेलदार राहतो. घामामुळे त्वचेचे लवकर निर्जलीकरण होते.
2. आपल्या दैनंदिन आहारात फळे खा
वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना साखर कमी करण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. जी तुम्हाला दिवसभर ऊर्जा देते. आपण फळे खाल्लीतर आपल्याला बऱ्याच वेळ भूक देखील लागत नाही. फळे ऊर्जा प्रदान करतात. तसेच निरोगी राहण्यासाठी फळे खाणे अत्यंत महत्वाचे आहे.
3. व्यायाम करा
बराच वेळ एकाच जागी बसून राहिल्याने वजन वाढते. यामुळे आपण सतत हालचाली करत राहिले पाहिजे. दररोज सकाळी पळणे, चालणे, पोहणे, सायकलिंग, दोरीवरच्या उड्या, योगासने असा कुठल्याही पध्दतीचा व्यायाम हा केला पाहिजे. तसेच दिवसभर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. पायऱ्या चढणे, थोडे चालणे किंवा फोनवर बोलताना चालणे तुमच्या चयापचयला चालना देऊ शकते आणि तुमचे वजन कमी करण्यास मदत करू शकते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health | वाढत्या वयासह शरीराला व्हिटामिनची गरज, अन्यथा गंभीर आजारांची शक्यता!https://t.co/1DN3A5Xg5M#vitamins #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 10, 2020
(Here are 3 things to keep in mind when losing weight)