Home Remedies for Dry Cough : कोरड्या खोकल्याने हैराण आहात? मग, हे घरगुती उपाय नक्की करून पाहा
बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना अनेकदा सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, कधीकधी सर्दी किंवा खोकल्याची समस्या देखील उद्भवत असते. या दरम्यान, घसा खवखवणे हे सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. अशा वातावरणात सहसा कोरडा खोकला होतो आणि कफ तयार होत नाही.
मुंबई : बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना अनेकदा सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, कधीकधी सर्दी किंवा खोकल्याची समस्या देखील उद्भवत असते. या दरम्यान, घसा खवखवणे हे सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. अशा वातावरणात सहसा कोरडा खोकला होतो आणि कफ तयार होत नाही.
कोरडा खोकला सहसा सर्दी आणि फ्लू सारख्या विषाणूजन्य संसर्गामुळे होतो. हे एलर्जी किंवा घशात जळजळ झाल्यामुळे देखील होऊ शकते. तसेच, जेव्हा कोरडा खोकला बराच काळ टिकून राहतो, तेव्हा त्या व्यक्तीला चघळण्यात आणि गिळण्यातही अडचण येते.
कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय :
तुळशी आणि मध
तुळशी आणि मध हे दीर्घ काळापासून आयुर्वेदिक औषधाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोरड्या खोकल्यावर उपाय म्हणून तुम्ही तुळशी आणि मध युक्त चहा बनवू शकता. मधातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक आणि बुरशीविरोधी गुणधर्म आरोग्याच्या अनेक समस्या टाळण्यास मदत करतात, तर तुळस बराच काळ त्याच्या उपचारात्मक गुणधर्मांसाठी ओळखली जाते.
हळदीचे दूध
हळदीचे दूध खोकल्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त, हळद रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगापासून संरक्षण करण्यासाठी ओळखली जाते. यासाठी तुम्ही एक ग्लास कोमट हळद दुधाचे सेवन करू शकता. हे तुमच्या घशाला आराम देण्याचे काम करेल. या शिवाय तुम्ही आहारात देखील हळद समाविष्ट करू शकता.
जेष्ठमध
आयुर्वेदिक औषधी वनस्पती मुलेठी अर्थात जेष्ठमध श्वसन आणि आतड्यांसंबंधी समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो. घसा खवखवणे, संसर्ग होणे, घशात जळजळ होत असल्यास जेष्ठमधाचा एक छोटा तुकडा घ्या आणि तोंडात ठेवून चघळा. यामुळे घशाच्या समस्यांपासून आराम मिळेल.
मीठाचे पाणी
घशातील खवखव आणि कोरड्या खोकल्यावर उपचार करण्याचा ‘मीठाच्या पाण्याच्या गुळण्या’ हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. झटपट परिणामांसाठी, कोमट पाण्यात मीठ मिसळा आणि दिवसातून कमीतकमी दोनदा गुळण्या करा.
मेथीचे दाणे
मेथीचे दाणे त्यांच्या दाहक-विरोधी गुणांसाठी ओळखले जातात. हे आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या, विशेषत: घशातील समस्या टाळण्यास मदत करतात. यासाठी थोड्या पाण्यात मेथीच्या बिया घालून ते वेगळा रंग होईपर्यंत शिजू द्या. त्या शिजवल्यानंतर गॅसवरून काढून थंड होऊ द्या. चांगल्या परिणामांसाठी, दिवसातून कमीतकमी दोनदा या काढ्याने गुळण्या करा.
तूप
तुपामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक आणि विरोधी दाहक गुणधर्म, तसेच घसा ओलसर ठेवण्याची क्षमता आहे. यासाठी तुम्ही काळी मिरी पावडर आणि शुद्ध देसी तूप मिसळून त्याचे चाटण घेऊ शकता. मात्र, ते खाल्ल्यानंतर काही वेळ अजिबात पाणी पिऊ नका.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
हेही वाचा :
Health Tips | मधुमेहाच्या रुग्णांनी रोज प्यावा ‘या’ 5 प्रकारचा चहा, रक्तातील साखर राहील नियंत्रणात!
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सनी त्रस्त आहात, ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करून पाहा