तिळाचे लाडू ते खिचडी, रेवडीपर्यंत… प्रत्येक ठिकाणची संक्रांत स्पेशल डिश, जाणून घ्या
मकर संक्रांतीच्या दिवशी देशभरात प्रचंड उत्साह असतो. आकाशात सर्वत्र पतंग उडताना दिसतात. हा दिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो आणि खानपान देखील खूप वेगळे असते. मकर संक्रांतीला खाण्यात देशातील विविध राज्यांमध्ये नेमकं काय असतं, जाणून घेऊया.
संक्रांत येत आहे. तुम्ही आकाशात आतापासूनच पतंग उडताना पाहत असाल. तुमच्या घरी देखील तिळाचे लाडू बनवण्याची तयारी सुरू झाली असेल. आज आम्ही तुमच्यासाठी खास माहिती सांगणार आहोत. संक्रांतीला देशातील प्रत्येक राज्यात काहीना काही खास असते, खाण्यापासून ते बरंच काही जाणून घेऊया.
मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या दिवशी आकाशात रंगीबेरंगी पतंग उडताना दिसतात, तर प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण असते. प्रत्येक राज्यात संक्रांतीच्या नावात तसेच जेवणात फरक आहे.
सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्याच्या स्मरणार्थ मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आणि बहुतेक वेळा हा दिवस दरवर्षी 14 जानेवारीला येतो. यंदाही मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी केली जाणार आहे.
मकर संक्रांतीचा सण केवळ धार्मिक श्रद्धा ठेवत नाही, तर तो भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व देखील करतो. या सणाचा संबंध निसर्गाशीही असल्याचे मानले जाते. या दिवसापासून थंडीची लाट संपते आणि हळूहळू वातावरण तापायला लागते, असे म्हटले जाते.
मकर संक्रांतीचे जेवण देशातील विविध राज्यांमध्ये कसे असते. चला तर मग जाणून घेऊया
महाराष्ट्राची मकर संक्रांत
मकर संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रात तिळाचे लाडू आणि खिचडी बनवून खाल्ली जाते. तसेच तीळ आणि गुळापासून विविध प्रकारचे लाडू, तिळाची पापडी देखील तयार करतात. या दिवशी तिळगुळ खा गोड गोड बोला, असं म्हटलं जातं.
उत्तर प्रदेशातील मकर संक्रांत
मकर संक्रांतीच्या सणाबाबत उत्तर प्रदेशातही उत्साह आहे. या दिवस खिचडी केली जाते. तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू खाण्याबरोबरच खिचडीही घरोघरी खास बनवतात.
गुजरातमध्ये मकर संक्रांत
गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी प्रचंड उत्साह असतो. गुजरातमध्ये उत्तरायणाच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो आणि सर्वत्र रंगीबेरंगी पतंग उडतात. पतंग स्पर्धाही होतात. तिलपाक व्यतिरिक्त उंधियू खास घरोघरी बनवला जातो, जो गुजरातचा पारंपरिक पदार्थ आहे.
राजस्थानमध्ये मकर संक्रांत
राजस्थानमध्येही मकर संक्रांत पाहायला मिळते. या दिवशी घरोघरी गजक आणि तिळाचे लाडू बनवून खाल्ले जातात. या दिवशी दही आणि चिऊडा मोठ्या आवडीने खाल्ला जातो. आकाश पतंगांनी व्यापलेले असते. याशिवाय राजस्थानी गोड ‘घेवर’चाही खूप आस्वाद घेतला जातो.
राज्य आणि मकर संक्रांतीची नावे
दक्षिण भारतातील केरळ राज्यात मकर विलाक्कू या नावाने मकर संक्रांत साजरी केली जाते आणि सूर्यदेवाची पूजा केली जाते. तामिळनाडूमध्ये हा दिवस पोंगल म्हणून साजरा केला जातो. कर्नाटकात मकर संक्रांतीला ‘एलू बिरोधू’ म्हणून ओळखले जाते. पंजाब आणि हरयाणामध्ये मकर संक्रांत माघी लोहडी म्हणून साजरी केली जाते, जरी लोहडी एक दिवस आधी साजरी केली जाते आणि लोक अग्नीप्रदक्षिणा करताना पूजा करतात. रेवडी शेंगदाणे देतात.