Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Microwave Cleaning at Home: मायक्रोवेव्ह ओव्हनची स्वच्छता करण्यासाठी वापरा या ट्रिक्स, दुर्गंधी होईल दूर

आजकाल सर्वांच्या किचनमध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन हमखास आढळतो. तो साफ , स्वच्छ करण्याच्या ट्रिक्स जाणून घ्या.

Microwave Cleaning at Home: मायक्रोवेव्ह ओव्हनची स्वच्छता करण्यासाठी वापरा या ट्रिक्स, दुर्गंधी होईल दूर
मायक्रोवेव्ह ओव्हनची स्वच्छता करण्यासाठी वापरा या ट्रिक्स, दुर्गंधी होईल दूरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 4:33 PM

नवी दिल्ली: आजकाल सर्वांच्याच घरात मायक्रोवेव्ह ओव्हन (Microwave) आढळतो. जेवण गरम करण्यापासून ते नवनवे पदार्थ बनवण्यापर्यंत अनेक गोष्टी या ओव्हनमुळे अतिशय सोप्या बनल्या आहेत. त्यामुळे पदार्थ (food) पटकन बनतात, त्यांची चव वाढते आणि आपले कामही सोपे होते. मात्र काही महिलांना हा ओव्हन साफ ठेवणे, त्याची स्वच्छता (cleaning) करणे हे थोडं कठीण वाटतं. बऱ्याच वेळेस अन्न गरम करताना त्याचा वास ओव्हनमध्ये राहतो. तसेच खूप दिवस स्वच्छता केली नाही तर ओव्हन घाण दिसूही लागतो. ओव्हन सहज, सोप्या पद्धतीने साफ, स्वच्छ करण्यासाठी काही टिप्सचा वापर करू शकतो.

ओला पेपर टॉवेल

मायक्रोवेव्ह ओव्हन साफ करण्यासाठी ओल्या पेपर टॉवेलचा वापर तुम्ही करू शकता. त्यासाठी वेट पेपर टॉवेल घेऊन तो मायक्रोवेव्हमध्ये ठेवावा आणि ओव्हन 5 मिनिटांसाठी सुरू करावा. यामुळे वाफ तयार होईल ज्यामुळे ओव्हनमधील दुर्गंधी शोशली जाऊन ती कमी होईल. त्यानंतर ओव्हन पेपर टॉवेलने स्वच्छ पुसून घ्यावा.

हे सुद्धा वाचा

डिश सोपचा वापर ठरेल उपयुक्त

वेट पेपर टॉवेलप्रमाणेच हा उपायही चांगला ठरेल. त्यासाठी एका नॉन-मेटालिक मायक्रोवेव्ह-सेफ बाऊलमध्ये पाणी घ्यावे व त्यामध्ये लिक्विड डिश सोपचे काही थेंब टाकावेत. त्यानंतर तो बाऊल मायक्रोवेव्हमध्ये ठेून ओव्हन 1 मिनिटासाठी हाय टेम्परेचरवर अथवा वाफ तयार होईपर्यंत सुरू ठेवावा. त्यानंतर ओव्हन थंड झाल्यावर पाण्याचा बाऊल काढून घ्यावा व साध्या कापडाने किंवा स्पंजने ओव्हन स्वच्छ पुसून कोरडा करावा.

बेकिंग सोडा

मायक्रोवेव्हमध्ये अडकलेली घाण साफ करण्यासाठी किंवा क्लिनिंग करण्यासाठी इतर पदार्थांच्या तुलनेत, बेकिंग सोडा हा एक उत्तम पर्याय आहे. बेकिंग सोडा व पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवा आणि ओव्हनमध्ये जिथे एखादा पदार्थ अडकला असेल, त्यावर ही पेस्ट लावावी. ते कमीत कमी 5 मिनिटे तसेच राहू द्यावे.

त्यानंतर स्पंज किंवा ओल्या कापडाने ओव्हन स्वच्छ पुसावा. पुन्हा एक साधे कापड घेऊन ओव्हन कोरडा करावा. या उपायांनी तुमच्या ओव्हनमधील घाण तसेच दुर्गंधी दूर होईल. व तो पूर्वीप्रमाणे चमकू लागेल.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.