Weight Loss : वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात? मग, चुकूनही केळी खाऊ नका!

वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात. परंतु त्याच वेळी, आहार घेत असताना, आपण काही फळांचे सेवन वाढवतो आणि मग विचार करतो की, दुसर्‍या दिवशी लगेच आपले वजन कमी होईल.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात? मग, चुकूनही केळी खाऊ नका!
केळी
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 3:54 PM

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असताना आपण काय खातो हे सर्वात महत्वाचे आहे. परंतु त्याच वेळी, आहार घेत असताना काही फळांचे सेवन आपण करतो आणि मग विचार करतो की, दुसर्‍या दिवशी लगेच आपले वजन कमी होईल. परंतु असे होत नाही, कारण आपण अशी काही फळे खातो, ज्यात जास्त प्रमाणात कॅलरी असतात. ज्यामुळे आपले वजन कमी होण्यापेक्षा वाढण्याची अधिक शक्यता असते. (If you want to lose weight, don’t eat bananas in your diet)

केळी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीती आहे. पण ही एक अशी गोष्ट आहे जी आपण जास्त प्रमाणात घेऊ शकत नाही. केळी कॅलरींनी परिपूर्ण आहे आणि त्यात अत्यधिक नैसर्गिक साखर आहे. केळ्यामध्ये सुमारे 150 कॅलरीज असतात, तर सुमारे 37.5 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. म्हणून, जर तुम्ही दररोज 2-3 केळी खाल्लीत तर वजन वाढण्याची शक्यता असते. काही लोक वजन कमी करण्यासाठी आपल्याला दररोजच्या आहारात केळीचा समावेश करतात.

यामुळे वजन कमी होण्यापेक्षा अधिक होते. ज्या लोकांना आपले वजन झटपट कमी करायचे आहे. अशांनी केळी खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. उपाशी पोटी केळी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. केळी उपाशी पोटी खाल्ल्याने मायग्रेनच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे. असेही म्हटले जाते की, केळी चुकीच्या वेळी खाल्ल्यास, आपल्या रक्तातील खनिजे कमी होतात. केळीमध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

पचनासाठी सगळ्यांत चांगली केळी ही पिवळी आणि ज्याच्या सालीवर तपकिरी रंगाचे छोटे छोटे ठिपके असतात. ती केळी सगळ्यात चांगली असते. केळ्यामध्ये उच्च फायबर असते. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. मात्र, ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, अशांनी आपल्या आहारात केळी घेणे टाळावेच.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(If you want to lose weight, don’t eat bananas in your diet)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.