Health Care : दररोजच्या आहारात 2 अंड्यांचा समावेश करा आणि उंची वाढवा! 

आपण दररोजच्या आहारामध्ये काय खातो हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण आपल्या खाण्यावरच आपल्या शरीराची वाढ ही ठरलेली असते.

Health Care : दररोजच्या आहारात 2 अंड्यांचा समावेश करा आणि उंची वाढवा! 
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 7:34 AM

मुंबई : आपण दररोजच्या आहारामध्ये काय खातो हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण आपल्या खाण्यावरच आपल्या शरीराची वाढ ही ठरलेली असते. सध्या बरेच लोक उंची वाढत नसल्यामुळे त्रस्त आहेत. कारण सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपण हेल्दी आहारापेक्षा जास्त फास्ट फूड खाण्यावर भर देतो. यामुळे शरीराची वाढ म्हणावी तशी होत नाही. आपण आपल्या दररोजच्या आहारात अंड्याचा समावेश केला तर आपली उंची वाढण्यास मदत होते. (Include 2 eggs in the diet and increase height)

अंडीमध्ये प्रथिने, राइबोफ्लेविन, बायोटिन आणि लोह असतात. यामुळे आपली उंची वाढण्यास मदत होते. अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.

यामुळे तुम्ही जर दिवसांतून दोन अंडे खाल्ली तर तुमच्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर ठरणार आहे आणि तुम्ही अनेक रोगांपासून दूर देखील राहू शकतात. यामुळे आजपासूनच आपण आहारामध्ये दोन अंडे घेण्यास सुरूवात करावी. अंड्याच्या पिवळ्या बलकातील घटक थेट आपल्या हृदयावर परिणाम करतात. अंड्यांना पिवळ्या बालकाला कोलीनचा मुख्य स्त्रोत मानले जाते, जो आपल्या मेंदूतल्या मुख्य न्युरोट्रांसमीटरपैकी एक, एसिटिल्कोलीनचा एक प्रमुख घटक आहे.

डीके पब्लिशिंगच्या ‘हिलिंग फूड्स’ पुस्तकानुसार, अंड्यातील पिवळ बलकामध्ये अँटीऑक्सिडेंट्स, ल्युटिन आणि झेंथाइन असतात. जे आपल्या डोळ्यांचे रक्षण करतात आणि दृष्टी देखील मजबूत करतात. अंड्यात ट्रिप्टोफेन आणि टायरोसिन हे घटक असतात. यासह, अंड्यांमध्ये अमिनो आम्ल देखील आहेत जे, आपला हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहेत.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include 2 eggs in the diet and increase height)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.