Health Care : आहारात अँटी ऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांचा समावेश करा आणि सुंदर त्वचा मिळवा!
टवटवीत आणि तजेलेदार त्वचा असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, अनेक उपाय करून देखील चांगली आणि टवटवीत त्वचा मिळत नाही.
मुंबई : टवटवीत आणि तजेलदार त्वचा असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, अनेक उपाय करून देखील चांगली आणि टवटवीत त्वचा मिळत नाही. जर खरोखरच आपल्याला चांगली त्वचा हवी असले तर आपण आहाराकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. कारण बाहेरून त्वचेला किती ही क्रिम लावल्या तरी काहीही फायदा होत नाही. त्यासाठी आपल्याला आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागते. (Include antioxidants in your diet and get beautiful skin)
चेहऱ्याची बाहेरुन काळजी घेण्यासोबतच योग्य आहार घेणेही गरजेचे आहे. शरीराला आतून पोषण होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. नैसर्गिक ग्लो मिळवायचा असेल, तर आहारात द्राक्षे, नट्स आणि हेल्दी पदार्थांचा समावेश आहारात करायला हवा. विशेष म्हणजे व्यायाम करूनही आपण सुंदर त्वचा मिळून शकतो. या सर्व गोष्टींचे पालन केल्यास तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार आणि टवटवीत वाटेल.
आंतरीक सौंदर्य मिळवण्यासाठी आपल्याला खूप काही वेगळे करण्याची काही गरज नाही फक्त आपल्याला आपला आहारात काही बदल करावे लागती त्यानंतर आपली त्वच्या सुंदर, तजेदार आणि चमकदार बनते. जवसाच्या बियांचा आहारात समावेश केला तर तुमच्या त्वचेसाठी अत्यंत चांगले आहे. तुम्ही जवसाच्या बिया तशाच कच्चा खाऊ शकतात किंवा जवसाची चटणी देखील करू शकतात. जवसाच्या बियांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असते.
आद्रकही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आद्रकमध्ये पोटॅशियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यासारखे गुणधर्म आहेत. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. विशेष म्हणजे आद्रकमधील ऑक्सिडंट्समुळे आपल्या त्वचेच्या समस्या दूर होतात. आद्रकामध्ये आढळणारा फायटोन्यूट्रिएंट जिंजरॉल हा प्रमुख घटक निरोगी सूक्ष्मजंतू तयार करतो आणि आपल्या पाचक समस्यांना प्रतिबंधित करतो.
(टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठलाही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…
Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(Include antioxidants in your diet and get beautiful skin)