Weight Loss Tips : वाढलेले वजन झटपट कमी करण्यासाठी काळी मिरी प्रभावी, अशाप्रकारे आहारामध्ये समावेश करा!

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही काळ्या मिरीपासून बनवलेल्या चहाचे सेवन करू शकता. ते बनवायला अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला 1 टीस्पून काळी मिरी, आले, मध, 1 कप पाणी आणि लिंबू लागेल. पाणी गरम करा. त्यात किसलेली काळी मिरी आणि आले घाला. हे पाणी 5 मिनिटे उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा.

Weight Loss Tips : वाढलेले वजन झटपट कमी करण्यासाठी काळी मिरी प्रभावी, अशाप्रकारे आहारामध्ये समावेश करा!
Image Credit source: unsplash.com
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 8:30 AM

मुंबई : पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी काळ्या मिराचा (Black pepper) वापर केला जातो. झणझणीत वरण किंवा भाजी करायची असेल तर काळी मिरीचे पावडर टाकले जाते. मात्र, फक्त पदार्थांचा चवच वाढवण्यासाठी काळी मिरी फायदेशीर नसून आपण आरोग्यासाठी देखील काळी मिरी अत्यंत फायदेशीर (Beneficial) आहे. काळी मिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. काळ्या मिरीमध्ये जीवनसत्त्वे ए, के, सी आणि कॅल्शियम, पोटॅशियम आणि सोडियम असते आणि रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यासाठी काळी मिरी खूप गुणकारी आहे. विशेष: वाढलेले वजन कमी करण्यासाठी काळी मिरीचे सेवन करावे. यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी जलद बर्न होण्यास मदत होते.

काळी मिरीचे खास पेय

वजन कमी करण्यासाठी काळी मिरी खूप जास्त फायदेशीर ठरते. यासाठी आपण रात्री सात ते आठ काळी मिरी पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी काळी मिरी पाण्यामध्ये टाका आणि पाणी गरम करा. हे खास पाणी कोमट झाले की, प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. त्वचेवर चमक देखील येण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

काळी मिरीचा चहा

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही काळ्या मिरीपासून बनवलेल्या चहाचे सेवन करू शकता. ते बनवायला अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला 1 टीस्पून काळी मिरी, आले, मध, 1 कप पाणी आणि लिंबू लागेल. पाणी गरम करा. त्यात किसलेली काळी मिरी आणि आले घाला. हे पाणी 5 मिनिटे उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. त्यात लिंबू आणि मध घाला आणि प्या. यामुळ वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.

काळी मिरी खा

जर तुम्हाला खरोखरच वजन कमी करायचे असेल तर काळ्या मिरीचे पाणी किंवा चहाऐवजी तुम्ही थेट काळ्या मिरीचे सेवन देखील करू शकता. यामुळेही वजन कमी करण्यास मदत होते. यासाठी तुम्ही रोज सकाळी दोन ते तीन काळ्या मिरींचे सेवन करू शकता. तुम्हाला बाजारामध्ये शुद्ध काळी मिरी तेल मिळू शकते. या तेलाचा एक थेंब सकाळी एक ग्लास पाण्यात टाका. त्याचे सेवन करा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. मात्र, बरेच लोक एक थेंबपेक्षाही अधिक तेल टाकून पितात. मात्र, हे आपल्या आरोग्यासाठी घातक आणि धोकादायक देखील आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.