Health Care Tips : उन्हाळ्यात दररोज खा दही, हे 4 फायदे नक्कीच होतील!
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये निरोगी राहण्यासाठी काय खाणे आणि काय खाणे टाळावे हे लोकांना समजत नाही. कारण उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. या हंगामात आपले शरीर (Body) थंड ठेवणे महत्वाचे आहे. आपले शरीर थंड ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी या हंगामामध्ये आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये दह्याचा (Curd) समावेश करणे अत्यंत फायदेशीर आहे.
मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये निरोगी राहण्यासाठी काय खाणे आणि काय खाणे टाळावे हे लोकांना समजत नाही. कारण उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. या हंगामात आपले शरीर (Body) थंड ठेवणे महत्वाचे आहे. आपले शरीर थंड ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी या हंगामामध्ये आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये दह्याचा (Curd) समावेश करणे अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे दह्यापासून रायता, कोशिंबीर, लस्सी, ताक आणि बुंदी रायता असे विविध प्रकारे तयार करून आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. नियमित दही खाल्ल्याने आपले शरीर थंड राहण्यास मदत होते.
दही खाण्याचे हे फायदे नक्की वाचा!
-दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात. दही एनर्जी बूस्टर देखील आहे. त्यामुळे ताण-तणाव देखील कमी होतो. विशेष म्हणजे दही खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.
-हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे. इतकेच नव्हेतर दही खाल्ल्याने केस आणि त्वचा देखील निरोगी राहण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तर दह्याचा आहारात समावेश कराच.
-ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी तर आपल्या आहारामध्ये दही समाविष्ट करणे गरजेचेच आहे. कारण दही हे आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी दूर करण्याचे काम करते. तसेच दह्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात.
-उन्हाळ्यात रोज दह्याचे सेवन केल्यास वजन कमी करण्यासोबतच उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्याही दूर होते. यामुळे आपल्या आहारामध्ये दह्याचा समावेश करा. जर आपल्याला दही खायला आवडत नसेल तर आपण आपल्या दुपारच्या आहारामध्ये ताक देखील घेऊ शकता.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)
संबंधित बातम्या :
Skin Care : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या कोरियन टिप्स फाॅलो करा आणि सुंदर त्वचा मिळवा!
Skin care : उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेवरील तेज टिकवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा!