Weight loss : पोटावरची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण खा, जाणून घ्या अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी इंटरनेटवर अनेक टिप्स दिल्या जातात. मात्र, कोणत्याही टिप्सची पूर्ण माहीती घेतल्याशिवाय त्या फाॅलो करणे चुकीचे आहे. आपल्या माहीती आहे का? की, दररोज सकाळी उपाशी पोटी लसूण खाल्ल्याने आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते.

Weight loss : पोटावरची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण खा, जाणून घ्या अनेक फायदे
वाढलेले वजन
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 10:28 AM

मुंबई : मुळात वजन कमी करणेच सोपे काम नाहीये. त्यामध्येही पोटावरची चरबी कमी करणे त्यापेक्षाही कठिण आहे. वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि आहाराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. तज्ञांच्या मते, 70 टक्के आहार आणि 30 टक्के व्यायाम वजन कमी करण्यासाठी जबाबदार असतात. (Include garlic in the diet to reduce belly fat)

वजन कमी करण्यासाठी इंटरनेटवर अनेक टिप्स दिल्या जातात. मात्र, कोणत्याही टिप्सची पूर्ण माहीती घेतल्याशिवाय त्या फाॅलो करणे चुकीचे आहे. आपल्या माहीती आहे का? की, दररोज सकाळी उपाशी पोटी लसूण खाल्ल्याने आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते. लसूण वजन कमी करण्यास कशी मदत करते ते जाणून घेऊयात.

लसणाचे फायदे

लसूण हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे. हे शरीराच्या नसांना आराम देते. तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान टाळते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. हे व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, फायबर, कॅल्शियम आणि मॅंगनीज सारख्या महत्त्वपूर्ण पोषक घटकांनी समृद्ध आहे.

वजन कमी करण्यासाठी लसूण

लसूणमध्ये अनेक पोषक घटक असतात. जे वजन कमी करण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही निरोगी आहार आणि नियमित व्यायाम करता तेव्हाच तुम्ही रिकाम्या पोटी लसणाचे सेवन करावे. हे शरीरातील ऊर्जा वाढवण्याचे काम करते. त्यात पोषक घटक असतात जे चयापचय वाढवण्यास मदत करतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.

जर तुम्ही रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केले तर पोट बराच काळ भरलेले राहते आणि अति खाणे टाळते. हे आपली भूक शांत ठेवण्यास मदत करते. जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, लसूण चरबी बर्न संबंधित आहे. यात डिटॉक्सिफायिंग गुणधर्म देखील आहेत जे शरीरातून विष बाहेर काढण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी या पध्दतीने लसूण वापरा

वजन कमी करण्यासाठी दररोज 2 लसूण रिकाम्या पोटी खा. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर लसूण वापरू नका. गर्भवती महिला, मुले आणि कमी रक्तदाब, रक्तस्त्राव विकार आणि मधुमेहाच्या रुग्णांनी हा घरगुती उपाय वापरू नये.

रक्तदाब समस्या

लसणाच्या सेवनामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते. ज्या लोकांना उच्च रक्तदाब समस्या आहे. त्यांच्यासाठी खूप लसूण खूप फायदेशीर आहे. अल्झायमर या रोगाच्या दरम्यान, स्मरणशक्ती कमी होऊ लागते. हा रोग बहुतेक वेळेस म्हातारपणात होतो. लसूणमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हा रोग रोखण्यास ते मदत करतात. म्हणून, लसणाच्या सेवनाने हा रोग रोखू शकतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include garlic in the diet to reduce belly fat)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.