फिट राहण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश, आरोग्याशी संबंधित समस्या होतील दूर
मॅग्नेशियम हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मॅग्नेशियम मुळे शरीराला अनेक फायदे होतात. मॅग्नेशियम शरीरातील 300 पेक्षा जास्त जैवरासायनिक प्रतिक्रिया नियंत्रित करण्यास मदत करते. जाणून घेऊया मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.
हिवाळ्यात आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. हिवाळ्यामध्ये अनेक लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आरोग्याला हानी पोहचणार नाही.हिवाळ्यामध्ये मॅग्नेशियमचा आहारात समावेश करणे देखील गरजेचे आहे. ते खनिज आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
पोषणतज्ञ नमामी अग्रवाल सांगतात की मॅग्नेशियम केवळ हाडे, स्नायू आणि मज्जासंस्थेसाठी महत्त्वाचे नाही तर ते शरीराला ऊर्जा प्रदान करते. हे खाल्ल्याने तणावही कमी होतो. नमामी अग्रवाल यांनी मॅग्नेशियम समृद्ध पदार्थांबद्दल देखील सांगितले आहे जे तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट होऊ शकतात.
पालक
पालक मॅग्नेशियमचा समृद्ध स्त्रोत आहे. पालकांमध्ये विटामिन ए, के, लोह आणि कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असते. एक कप शिजवलेल्या पालकमध्ये सुमारे 157 मिलीग्राम मॅग्नेशियम असते. जे एखाद्या व्यक्तीची दैनंदिन मॅग्नेशियमच्या 40% गरज पूर्ण करू शकते. पालक तुम्ही सॅलड, सुप्स, स्मूदी किंवा साईड डिश म्हणून देखील खाऊ शकता.
बदाम
बदामामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. सुमारे 20 ते 23 बदामामध्ये 80 मिलीग्राम मॅग्नेशियम असते. बदाम नाश्ता, शेक, दही आणि सॅलड म्हणून देखील तुम्ही खाऊ शकतात.
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बिया मॅग्नेशियमचा सर्वात प्रभावी स्त्रोत आहे. एक कप भोपळ्याच्या बियांमध्ये सुमारे 168 मिलिग्रॅम मॅग्नेशियम असते. भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, प्रथिने आणि झिंक सारखे घटक असतात.
काळे सोयाबीन
काळया सोयाबीनमध्ये देखील मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. ते फायबर, प्रथिने आणि लोहाचा एक चांगला स्त्रोत आहे. ते सहजपणे सूप, सॅलड्स किंवा स्नॅक्स मध्ये तुम्ही खाऊ शकता.
एवोकॅडो
एवोकॅडो हे पौष्टिक फळ आहे. ज्यामध्ये मॅग्नेशियम व्यतिरिक्त अनेक आवश्यक पोषक घटक असतात. याच्या सेवनाने केवळ मॅग्नेशियम मिळत नाही तर हृदयाच्या आरोग्यासाठी देखील ते फायदेशीर आहे. ॲव्होकॅडो सॅलड, टोस्ट किंवा स्मूदीमध्ये खाऊ शकता.