Health Care Tips : निरोगी राहण्यासाठी या 3 पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, निरोगी जीवन जगण्यासाठी चांगला आहार (Diet) आणि व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या पदार्थांचा (Food) आहारात समावेश करू शकता. यामध्ये लसूण आणि ब्रोकोलीसारख्या अनेक पदार्थांचा समावेश होतो.

Health Care Tips : निरोगी राहण्यासाठी या 3 पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!
या पदार्थांचा आहारात समावेश करा आणि निरोगी राहाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 11:43 AM

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, निरोगी जीवन जगण्यासाठी चांगला आहार (Diet) आणि व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या पदार्थांचा (Food) आहारात समावेश करू शकता. यामध्ये लसूण आणि ब्रोकोलीसारख्या अनेक पदार्थांचा समावेश होतो. या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने आरोग्याशी (Health) संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत होते. चला जाणून घेऊया आहारात तुम्ही कोणत्या पदार्थांचा समावेश करू शकता. विशेष म्हणजे हे पदार्थ आपण वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील आहारामध्ये घेऊ शकतो.

डाळी

डाळी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. डाळींमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि आपले पोट बराच काळ भरलेले राहते. यामुळे डाळी वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहेत. डाळींमुळे आपली पचनसंस्था निरोगी राहते. जर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमी असेल तर तुम्ही आहारामध्ये डाळी घ्याव्यात. दररोज किमान एक वाटी डाळींचे आहारात समावेश करा आणि निरोगी जीवन जगा.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये ब्रोकोली, पालक, सैपू, मेथी आणि चुका फायदेशीर आहे, तसे तर प्रत्येक पालेभाजीच आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असते. पालेभाज्यांमध्ये लोह, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात. त्यात कॅल्शियम देखील असते. जर आपल्याला पालेभाजी खाण्यासाठी आवडत नसेल तर आपण हिरव्या पालेभाज्यांच्या रसाचे देखील सेवन करू शकतो.

लसूण

वरण, भाज्या, कढी असे कोणतेही पदार्थ असो लसण टाकल्याशिवाय ते चवदार होत नाहीत. भारतीय खाद्यपदार्थांमध्ये लसणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लसणामध्ये मॅंगनीज, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि फायबरसारखे पोषक घटक देखील असतात. ते अनेक रोग बरे करण्यास मदत करतात. यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते. विशेष म्हणजे लसण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Skin Care : ब्लॅकहेड्स काढण्यासाठी हे सोपे आणि घरगुती उपाय फायदेशीर, वाचा!

वजन कमी करण्यासोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर हा हर्बल चहा, जाणून घ्या ‘व्हाईट टी’बद्दल सविस्तर!

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.