Diabetes: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ 3 पेयांचा आहारामध्ये समावेश करा!
आज मधुमेह हा एक मोठा आजार बनत चालला आहे. पाचपैकी एक व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहे. मधुमेह हा मुख्यतः अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे होतो. या स्थितीत रक्तातील साखरेची पातळी वेळीच नियंत्रणात आणली नाही, तर भविष्यात या आजारात धोका अधिक होण्याची शक्यता असते.
मुंबई : आज मधुमेह हा एक मोठा आजार बनत चालला आहे. पाचपैकी एक व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहे. मधुमेह हा मुख्यतः अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे होतो. या स्थितीत रक्तातील साखरेची पातळी वेळीच नियंत्रणात आणली नाही, तर भविष्यात या आजारात धोका अधिक होण्याची शक्यता असते. आपण काही घरगुती उपाय करूनही रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळू शकता.
कारल्याचा रस
मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारले खूप फायदेशीर आहे. कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी अशी विविध जीवनसत्त्वे असतात. याव्यतिरिक्त, त्यात थायमिन आणि रिबोफ्लेविन सारखे घटक असतात, जे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी खूप उपयुक्त आहे. तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रोज सकाळी कारल्याचा रस प्या.
टोमॅटोचा रस
जवळपास आपल्या सर्व भाज्यांमध्ये टोमॅटो असते. टोमॅटो फक्त अन्नाची चवच वाढवत नाही तर ते आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहित आहे का की टोमॅटो मधुमेह कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. टोमॅटोमध्ये प्युरीन नावाचे अँटीऑक्सिडंट आढळते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळेच मधुमेहींनी टोमॅटोचा रस पिणे चांगले आहे.
काकडीचा रस
डाॅक्टर आपल्यापैकी सर्वांनाच आहारामध्ये काकडी समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. कारण काकडी ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ज्यात भरपूर पाणी आणि व्हिटॅमिन सी असते. पण तुम्हाला माहीत आहे का की काकडी मधुमेहींसाठीही खूप उपयुक्त आहे? खरं तर, ते अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि पोटॅशियमसह अनेक जीवनसत्त्वे समृद्ध आहे. त्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. मधुमेह असलेल्यांनी दररोज काकडीचा रस प्यावा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!