Winter Diet : बदलत्या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ 5 आरोग्यदायी पेयांचा आहारात समावेश करा!

पहाटे थंडीची चाहूल लागत आहे. या ऋतूत खोकला, सर्दी, घसा खवखवणे असे अनेक आजार येतात. तज्ञ अशा हंगामी रोगांपासून बचाव करण्यासाठी संपूर्ण पोषण आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याचा सल्ला देतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर खोकला, सर्दी, ताप यांपासून आपण दूर राहू शकतो.

Winter Diet : बदलत्या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'या' 5 आरोग्यदायी पेयांचा आहारात समावेश करा!
आरोग्यदायी पेय
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 6:24 AM

मुंबई : पहाटे थंडीची चाहूल लागत आहे. या ऋतूत खोकला, सर्दी, घसा खवखवणे असे अनेक आजार येतात. तज्ञ अशा हंगामी रोगांपासून बचाव करण्यासाठी संपूर्ण पोषण आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याचा सल्ला देतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर खोकला, सर्दी, ताप यांपासून आपण दूर राहू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला आहारात काही गोष्टींचा समावेश करावा लागेल.

आले, दालचिनी, लवंग इत्यादी घरी उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. औषधी वनस्पती आणि मसाले दुधात मिसळून विविध प्रकारचे आरोग्यदायी पेय बनवू शकतात. ते हिवाळ्यात तुम्हाला आराम देण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत बदलत्या ऋतूंमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणत्या पेयांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो ते जाणून घेऊया.

मसाला चहा

मसाला चहा लवंग, दालचिनी, वेलची, तमालपत्र, जायफळ इत्यादी मसाल्यापासून बनविली जाते. हा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही मसाला चहामध्ये दूध घालू शकता.

कहवा

मसाला चहाचा आणखी एक प्रकार, कहवा हे काश्मिरी पाककृतीतील एक पारंपारिक पेय आहे. हा ग्रीन टी, बदाम, केशर, वेलची, दालचिनी इत्यादी वापरून बनवला जातो. हे आपल्याला हंगामी बदलांशी लढण्यास मदत करेल.

काढा

काढा हे एक निरोगी पेय आहे. जे शतकानुशतके पारंपारिक औषधांचा एक भाग आहे. त्याला हर्बल टी असेही म्हणतात. हे अनेक औषधी वनस्पती आणि मसाल्यांचे पौष्टिक मिश्रण आहे. संसर्गाशी लढण्यासाठी काढा हा एक चांगला उपाय आहे.

केशर दूध

केशर दूध हे आरोग्यदायी आणि स्वादिष्ट पेय आहे. हे केवळ हिवाळ्यात तुम्हाला उबदार ठेवण्यास मदत करत नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. दूध आणि केशर व्यतिरिक्त, वेलची, पिस्ता आणि बदाम देखील या पेया मध्ये समाविष्ट करू शकता.

कांजी

कांजी हे उत्तर भारतातील लोकप्रिय पेय आहे. हे गाजर आणि बीटपासून बनवले जाते. त्याची चव मसालेदार आहे. मसाले आणि औषधी वनस्पतींच्या मिश्रणाने कांजी तयार केले जातेत्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या हिवाळ्यात तुम्ही हे पेय आहारात समाविष्ट करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.