Health Care : पावसाळ्याच्या हंगामात आपल्या आहारात ‘या’ 5 खाद्यपदार्थांचा समावेश करा!
आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. पावसाळ्याच्या हंगामात सर्दी, खोकला आणि ताप यांच्या समस्येत वाढ होते. या हंगामात आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते.
मुंबई : आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. पावसाळ्याच्या हंगामात सर्दी, खोकला आणि ताप या समस्येत वाढ होते. या हंगामात आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते. सध्याच्या कोरोना काळात तर सर्दी, खोकला आणि ताप होणार नाही, याकडे तर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या हंगामात आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. जेणे करून आपण आजारी पडणार नाहीत. हे आज आपण बघणार आहोत. (Include these 5 foods in the diet during the rainy season)
लसूण
लसूण अँटीऑक्सिडेंटमध्ये समृद्ध आहे. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि वायरसपासून आपले स्वरंक्षण करते. लसूण जवळजवळ कोणत्याही प्रकारे सेवन केला जाऊ शकतो. विशेष करून आपण डाळी, भाजीमध्ये लसणाचा समावेश केला जातो. लसूणामुळे पाचन तंत्राचे कार्य सुलभ करते. हे चयापचय दर देखील वाढवते.
आले
लसूण प्रमाणेच आले देखील अँटी-ऑक्सिडेंटमध्ये समृद्ध आहे. आल्याचा आपण आहारात समावेश केला पाहिजे. विशेष करून या हंगामात आपण आल्याचा चहा जास्तीत-जास्त घेतला पाहिजे. ज्यामुळे आपण सर्दी, ताप आणि खोकल्यापासून दूर राहू शकतो. पावसात भिजून आल्यावर नेहमी आल्याचा चहा घेतला पाहिजे.
हळद
हळद आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हळदीमुळे अनेक रोग आपल्यापासून दूर राहू शकतात. हळद जवळपास प्रत्येक भाजीमध्ये वापरली जाते. या पावसाळ्याच्या हंगामात आपण हळदीयुक्त दूध पिले पाहिजे. हळदीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.
बदाम
बदामांमध्ये प्रथिने जास्त आणि चरबी कमी असते. आपल्या दिवसाची सुरूवात करण्याचा हा एक चांगला मार्ग बदाम असू शकते. कारण ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार्या अनेक पौष्टिक पदार्थांनी भरलेले आहे. बदाम रोगांवर लढा देते, पचनशक्ती वाढवते आणि आपल्या साखरेची पातळी चांगली ठेवते.
पाणी
पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. चांगले आरोग्य आणि चांगली त्वचा पाहिजे असेल तर जास्त-जास्त पाणी पिणे फायदेशीर आहे. सतत बदलणारे तापमान आणि वाढत्या आर्द्रतेमुळे शरीरावर घाम येणे सुरू होते ज्यामुळे पाणी जास्त पिले पाहिजे. आपणास पावसाळ्याच्या काळात सामान्यत: विविध प्रकारचे संक्रमण आणि आजार होण्याचा धोका संभवतो. आपल्या शरीरास सर्व हानिकारक विषाणूंपासून मुक्त करण्यासाठी दररोज कमीतकमी 8 ग्लास पाणी प्या.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Baking Soda Scrub | हिवाळ्यात त्वचा निस्तेज झाली आहे, तर बेकिंग सोडा स्क्रब नक्की ट्राय कराhttps://t.co/0InIgl3meK#WinterDrySkin #BakingSodaScrub
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020
(Include these 5 foods in the diet during the rainy season)