Foods For Stamina : शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी ‘या’ पदार्थांनी दिवसाची सुरुवात करा आणि निरोगी राहा!
शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे महत्वाचे आहे. आपण दिवसाची सुरुवात काही आरोग्यदायी पदार्थांनी (Food) करू शकतो. ते आपल्याला दिवसभर ऊर्जा देतात. स्टॅमिना (Stamina) वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा (Foods For Stamina) समावेश करावा.
मुंबई : शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे महत्वाचे आहे. आपण दिवसाची सुरुवात काही आरोग्यदायी पदार्थांनी (Food) करू शकतो. ते आपल्याला दिवसभर ऊर्जा देतात. स्टॅमिना (Stamina) वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा (Foods For Stamina) समावेश करावा, असा प्रश्न अनेकवेळा मनात निर्माण होतो. आज आम्ही तुम्हाला काही काही आरोग्यदायी पदार्थांविषयी सांगणार आहोत. विशेष म्हणजे हे पदार्थ अगदी सहजपणे आपल्याला बाजारामध्ये मिळतात देखील.
केळी
नाश्त्यात केळी खाऊ शकता. हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात फायबर असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. यामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला ऊर्जावान ठेवतात. यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. हे तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करते.
सफरचंद
रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही डॉक्टरांपासून दूर राहू शकता. खरं तर हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात फ्लेव्होनॉइड्स नावाचे फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील तणाव कमी करण्यास मदत करतात. यामुळे तुमच्या शरीरात अधिक ऊर्जा राहते.
बदाम
बदामामध्ये भरपूर पोषक असतात. ते केवळ चयापचय गतिमान करत नाहीत तर ते तुमची सहनशक्ती देखील सुधारतात. बदाम हे निरोगी फॅट्सचे पॉवरहाऊस आहेत. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये बदामाचा नक्कीच समावेश करा.
दलिया
दलिया हे सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. ज्याने तुम्ही तुमचा दिवस सुरू करू शकता. दलियामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. तुम्ही ते प्री-वर्कआउट फूड म्हणूनही घेऊ शकता. ते आणखी हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही त्यात अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या देखील मिक्स करू शकता.
स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी हे एक स्वादिष्ट आणि लोकप्रिय फळ आहे. यामध्ये मिनरल्स, व्हिटॅमिन सी आणि फोलेटसारखे पोषक घटक असतात. स्ट्रॉबेरीमध्ये फिनॉल देखील असतात, जे आवश्यक अँटिऑक्सिडंट असतात. ते शरीरातील ऊर्जा पातळी वाढवतात. या फळाचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात सहज करू शकता.
संबंधित बातम्या :
चमकदार त्वचा हवीय, संत्री ते टोमॅटो ही फळं आहारात नक्की असूद्या