Breakfast Food : सकाळच्या नाश्त्यामध्ये ‘या’ घटकांचा आहारात समावेश करा आणि निरोगी आयुष्य जगा!

सकाळी नाश्ता करणे निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देतो. मात्र, अनेकजण वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यासाठी सकाळचा नाश्ता टाळतात.

Breakfast Food : सकाळच्या नाश्त्यामध्ये 'या' घटकांचा आहारात समावेश करा आणि निरोगी आयुष्य जगा!
हेल्दी आहार
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 11:29 AM

मुंबई : सकाळी नाश्ता करणे निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देतो. मात्र, अनेकजण वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यासाठी सकाळचा नाश्ता टाळतात. तुम्ही पण असे करत असाल तर आपण अनेक मोठ्या आजारांना निमंत्रणच देत आहात. कारण सकाळचा नाश्ता आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतो. त्यामध्येही तुम्ही काही पदार्थांचे नाश्त्यामध्ये सेवन केले तर थकवा आणि कमजोरी तुम्हाला कधीच येणार नाही. (Include these foods in your diet for breakfast and live a healthy life)

शेंगदाणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत, हे देखील आपल्याला ठाऊक नसेल. तज्ज्ञांच्या मते शेंगदाण्यात 25 टक्क्यांहून अधिक प्रथिने असतात. तज्ज्ञांच्या मते,  250 ग्रॅम शेंगदाण्यात जितके प्रोटीन आणि व्हिटामिन असतात, तितके 250 ग्रॅम मांसतही सापडत नाहीत. त्याच वेळी, एक अंड आणि दुधातील प्रथिने आपल्याला काही शेंगदाणे देऊ शकतात. जर एखादी व्यक्ती नियमितपणे शेंगदाणे खात असेल तर त्यांच्या शरीराला आवश्यक दूध, बदाम आणि तूप यांचे पोषण मिळते. यामुळे आपण सकाळी नाश्त्यामध्ये दररोज शेंगदाणे खाल्ले पाहिजेत.

एक ग्लास कोमट पाण्यात मध मिक्स करा आणि प्या. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल. हिवाळा असो किंवा उन्हाळा, शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. आपण दररोज सुमारे 2.5 लीटर ते 3 लिटर पाणी प्यायले पाहिजे. कोमट पाण्यात मध मिक्स करून पिल्याने  तुमची पचन क्रिया देखील मजबूत राहते. बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते. तसेच, डिहायड्रेशन देखील टाळता. कोमट पाणी पिण्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्तीही बळकट होते. जर आपल्याला सर्दी किंवा खोकला असेल, तर आपण नक्कीच गरम पाण्याचे सेवन केले पाहिजे.

बदामांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे, म्हणून मूठभर बदाम सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोकाही वाढत नाही. या व्यतिरिक्त, बदाम आपल्या शरीराची चयापचय टिकवून ठेवतात, जे आपल्या शरीराचे वजन कमी करण्यास आणि नियंत्रित करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. दररोज आपल्या नाश्त्यामध्ये बदामांचा समावेश करून आपण टाईप 2 मधुमेहाचा धोका टाळू शकता. बदामांमध्ये उच्च फायबर, असंतृप्त चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. यासह, बदाम कमी ग्लायसेमिक निर्देशांक श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत.

नाश्तामध्ये अंड्यांचं सेवन केल्यास लवकर वृद्धत्व येत नाही. त्वचा आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या सुरकुत्या कमी होतात. ज्यामुळे त्वचा बर्‍याच काळापर्यंत तजेलदार राहते. अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.

मोसंबी आणि संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी पर्याप्त प्रमाणात आढळते, जे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि रोगांशी लढायला मदत करते. म्हणून मोसंबीचे खाणे चांगले मानले जाते. आता सध्याच्या काळात तर अनेक वेळा डाॅक्टर रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी मोसंबीचे खाण्याचा सल्ला देखील देतात. मोसंबीचे सेवन केल्यास ब्लड प्रेशरची समस्याही दूर होते. कारण ते शरीर डिटॉक्सीफाई करते आणि मोसंबी खाल्लाने केल्याने आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडते. यामुळे सकाळी नाश्त्यामध्ये मोसंबीचे सेवन केले पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Include these foods in your diet for breakfast and live a healthy life)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.