महिलांनो…निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करा!
बदलेल्या जीवनशैलीमध्ये महिलांच्या जबाबदाऱ्या देखील बदलत चालल्या आहेत. या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. ज्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. तज्ञांचे म्हणणे आहे की, महिलांनी वयाच्या 20 व्या वर्षीनंतर आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.
मुंबई : बदलेल्या जीवनशैलीमध्ये महिलांच्या जबाबदाऱ्या देखील बदलत चालल्या आहेत. या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. ज्यामुळे त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. तज्ञांचे म्हणणे आहे की, महिलांनी वयाच्या 20 व्या वर्षीनंतर आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. विशेष करून आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. (Include these foods in your diet for women to stay healthy)
टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. यामुळे महिलांनी आपल्या आरोग्यामध्ये टोमॅटोचा समावेश केला पाहिजे.
महिलांनी आपल्या आहारामध्ये दूधाचा समावेश केला पाहिजे. दूध स्वतःच एक संपूर्ण अन्न मानले जाते. प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटकांमुळे दुधाची गुणवत्ता वाढते. जर दुधाला थंड पिण्याऐवजी, गरम करू सेवन केले गेले तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतात.
किवी कमी कॅलरीज असणारे एक पौष्टिक फळ आहे. किवीमध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात. किवी खाल्ल्याने पाचन शक्तीत वाढ होते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. किवीमुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स शांत झोपेसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. यामुळे आहारामध्ये किवीचा समावेश करा.
डाळीमध्ये लोह, जस्त, जीवनसत्त्वे, सेलेनियम आणि लाइझिनसारख्या आवश्यक अमीनो अॅसिड असतात. हे कॅल्शियम शोषण्यास मदत करतात. तसेच यामुळे तुमची भूक नियंत्रणात राहते. मूग, मटकी आणि लाल चवळीचा आहारात समावेश केला पाहिजे. कारण याचे पचन करणे फारच सोपे आहे. या डाळींमध्ये जीवनसत्त्वे आणि लोहयुक्त पदार्थ असतात. जी तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अधिक प्रभावी आहेत.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Include these foods in your diet for women to stay healthy)