Post Vaccination Diet : लसीकरणानंतरचे साईड इफेक्ट्स दूर करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

देशभरात कोरोना लसीकरणाचे काम जोरात सुरू आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर डोकेदुखी, ताप, अंगदुखी, थकवा आणि अशक्तपणा यासारखे साइड इफेक्ट होतात.

Post Vaccination Diet : लसीकरणानंतरचे साईड इफेक्ट्स दूर करण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा!
हेल्दी आहार
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 1:27 PM

मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाचे काम जोरात सुरू आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर डोकेदुखी, ताप, अंगदुखी, थकवा आणि अशक्तपणा यासारखे साइड इफेक्ट होतात. तज्ञांच्या मते आहारात बदल करून हे साइड इफेक्ट आपण कमी करू शकतो. कोरोनाची लस घेतल्यानंतर आपण काही खास पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे आपली डोकेदुखी, ताप, अंगदुखी, थकवा कमी होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. (Include these substances in the diet after taking the corona vaccine)

हळद

हळद हा एक भारतीय मसाला आहे. ज्यामध्ये बॅक्टेरियाविरोधी, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. हे आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्याचे काम करते. हळदमध्ये कर्क्युमिन आणि आवश्यक तेलाचे बायोएक्टिव्ह असतात. जे शरीरात उपचारात्मक औषध म्हणून कार्य करतात. यामुळे कोरोनाची लस घेतल्यानंतर आपल्या आहारात जास्तीत-जास्त हळदीचा समावेश करा.

आद्रक

आद्रक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पोटॅशियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यासारखे गुणधर्म आहेत. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कोरोनाची लस घेतल्यानंतर आहारात आद्रकचा समावेश करा. आपण डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी आद्रकचा चहा घेतला पाहिजे. आद्रकामध्ये आढळणारा फायटोन्यूट्रिएंट जिंजरॉल हा प्रमुख घटक निरोगी सूक्ष्मजंतू तयार करतो आणि आपल्या पाचक समस्यांना प्रतिबंधित करतो.

हिरव्या भाज्या खा

हिरव्या भाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन-सी, प्रोविटामिन ए, कॅरोटीनोईड्स, फोलेट, मॅंगनीज यासारख्या इतर गोष्टी असतात. या सर्व पौष्टिक गोष्टी चयापचय वाढविण्यास मदत करतात. या गोष्टी खाल्ल्यामुळे थकवा कमी होतो. साइड इफेक्ट कमी करण्यासाठी आपण आहारात हिरव्या भाज्या जास्तीत-जास्त घेतल्या पाहिजेत.

पाण्याने समृद्ध असलेले पदार्थ खा

कोरोनाची लस घेतल्यानंतर आपण आहारात पाण्याने समृद्ध असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. या गोष्टी खाल्ल्याने शरीर पूर्णपणे हायड्रेटेड राहील. याशिवाय हे शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यास मदत करते. पाण्याने समृद्ध असलेल्या गोष्टी आपल्याला ताजेतवाने आणि शांत ठेवतील. लसीकरणानंतर, संत्रा, खरबूज, काकडी इत्यादी गोष्टींचा आहारात समावेश करा.

मल्टीग्रेन

आपल्या आहारात कडधान्याचा समावेश करा. आपले पोट आणि पाचक प्रणाली निरोगी ठेवणे महत्वाचे आहे. हे फायबरमध्ये समृद्ध आहे जे उर्जा देण्यास तसेच शरीराचे पोषण करण्यात मदत करते.

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!

(Include these substances in the diet after taking the corona vaccine)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.