वृद्धत्व टाळण्यासाठी नाश्त्यात करा ‘या’ गोष्टींचा समावेश, शरीराला मिळेल मोठा फायदा
सकाळी नाश्ता करणे खूप आवश्यक आहे. पण अनेक जण सकाळी नाश्ता करण्याचे टाळतात. सकाळी हेल्दी नाश्ता केल्यामुळे वृद्धत्व लवकर येत नाही. जाणून घेऊया सकाळी नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ खाणे आवश्यक आहे.
Breakfast For Health : सकाळी नाश्ता करणे निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देतो. मात्र अनेक जण सकाळचा नाश्ता करण्याचे टाळतात. अनेकदा घरातील वडीलधारी मंडळी सांगतात की सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असतो. काही खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडावे. अशा स्थितीत व्यस्त जीवनशैली आणि खाण्याच्या योग्य सवयींचा अभाव याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.
हेल्दी नाश्ता केल्याने वृद्धत्व लवकर येत नाही आणि शरीराला ताजेपणा मिळतो जर तुम्ही नियमितपणे मोड आलेले मूग, सफरचंद, केळी, शेंगदाणे आणि खजूर तुमच्या सकाळच्या नाश्त्यात खाल्ले तर तुमचे शरीर निरोगी ठेवण्यास हे पदार्थ मदत करतील.
मोड आलेले मूग : मोड आलेले मूग प्रथिने, फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे यांनी समृद्ध आहे. हे पचन सुधारते शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवते आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
सफरचंद : सफरचंद हे फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटचा उत्तम स्त्रोत आहे. हे हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते आणि त्वचेचे आरोग्य राखण्यास देखील मदत करते. सफरचंद खाल्ल्याने पचनक्रिया ही सुधारते.
केळी : केळी पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 चा चांगला स्रोत आहे. हे स्नायूंची ताकद वाढवते शरीरातील ऊर्जा पातळी राखते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवते. याशिवाय मानसिक आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे.
खजूर : खजूर मध्ये लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करते, हाडे मजबूत करते आणि पचन सुधारते. याशिवाय त्वचा आणि केसांसाठीही ते फायदेशीर आहे.
शेंगदाणे : नाश्त्यामध्ये शेंगदाणे खाणे फायदेशीर आहे. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी शेंगदाणे पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी खावेत आरोग्य तज्ञांच्या मते पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम, लोह, आणि सेलेनियम यासारख्या गुणधर्मानीयुक्त शेंगदाणा भिजवल्याने त्याची पौष्टिक मूल्य आणखीन वाढतात. सकाळी नाष्ट्यामध्ये हे खाल्ल्याने गॅस आणि ऍसिडिटीची समस्या दूर होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)