वजन कमी करण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ‘या’ प्रथिनेयुक्त दुधांचा आहारात समावेश करा!

दूध हा आपल्या दैनंदिन आहाराचा एक आवश्यक भाग आहे. आपण चहा, कॉफी, शेक, स्मूदी किंवा कच्च्या अशा स्वरूपात दुधाचे सेवन करतो. याव्यतिरिक्त, दूध त्याच्या अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जाते. दूध हे जीवनसत्वे आणि खनिजांचे चांगला स्त्रोत आहे.

वजन कमी करण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी 'या' प्रथिनेयुक्त दुधांचा आहारात समावेश करा!
दूध
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 3:38 PM

मुंबई : दूध हा आपल्या दैनंदिन आहाराचा एक आवश्यक भाग आहे. आपण चहा, कॉफी, शेक, स्मूदी किंवा कच्च्या अशा स्वरूपात दुधाचे सेवन करतो. याव्यतिरिक्त, दूध त्याच्या अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखले जाते. दूध हे जीवनसत्वे आणि खनिजांचे चांगला स्त्रोत आहे. त्यात पोटॅशियम, बी 12, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या पोषक घटक असतात. (Include this protein-rich milk in your diet for weight loss)

हे प्रथिनांचे समृद्ध स्त्रोत देखील आहे. आपण पाहतो की, बाजारात दुधाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. बदामाचे दूध, सोया दूध, ओट्सचे दूध इ. हे वनस्पती-आधारित दूध दुग्धशर्करामुक्त आहेत. हे दूध तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यांचे आरोग्य फायदे जाणून घेऊया.

ओट्स दूध – संपूर्ण ओट्स भिजवून बनवलेले ओटचे दूध नैसर्गिकरित्या गोड असते. त्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. विशेष म्हणजे हे थोडे क्रीमयुक्त आहे. कारण त्यात काही फायबर असतात. फायबर पाणी शोषून घेते आणि पचन दरम्यान जेलमध्ये बदलते, जे पाचन मंद करण्यास मदत करते. हे आपले पोट बऱ्याच काळ भरलेले ठेवते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

नारळाचे दूध – हे दूध पौष्टिक, समृद्ध आणि मलईयुक्त आहे. या दुधामध्ये निरोगी चरबी मोठ्या प्रमाणात असते. हे डेझर्ट, स्मूदीज, आइस्क्रीम आणि करीसाठी वापरले जाते. परंतु आपण मर्यादित प्रमाणात नारळाचे दूध वापरा. त्याचा अतिरिक्त वापर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

बदामाचे दूध – हे दूध ग्राउंड बदामापासून बनवले जाते. जोपर्यंत आपण त्यात साखर घालत नाही तोपर्यंत इतर दुधाच्या तुलनेत कॅलरीज कमी असतात. हे कोलेस्टेरॉल आणि चरबी मुक्त असते. हे नैसर्गिकरित्या लैक्टोज मुक्त आहे. यात व्हिटॅमिन ए आणि डी भरपूर प्रमाणात असते.

सोया दूध – सोया दूध सोयाबीनपासून बनवले जाते. हे नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल, संतृप्त चरबी, कमी कॅलरीज आणि पूर्णपणे लैक्टोज नसलेले असते. त्यामुळे हृदयरोगाने ग्रस्त लोकांसाठी हे फायदेशीर आहे. सोयाबीन आणि सोया दूध हे प्रथिने, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे चांगले स्रोत आहेत. याव्यतिरिक्त, हे जीवनसत्त्वे बी 12, ए आणि डी मध्ये समृद्ध आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include this protein-rich milk in your diet for weight loss)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.