Watermelon : वजन कमी करण्यापासून ते दृष्टी वाढवण्यापर्यंत कलिंगड आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आहाराकडे (Diet) विशेष लक्ष द्यावे लागते. उन्हाळ्यात भरपूर पाणी असलेले पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये (Summer) आपण दररोज कलिंगडचे सेवन निरोगी राहण्यासाठी करायला हवे. त्यात कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. कलिंगडमध्ये (Watermelon) व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक पोषक घटक असतात.
मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आहाराकडे (Diet) विशेष लक्ष द्यावे लागते. उन्हाळ्यात भरपूर पाणी असलेले पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यामध्ये (Summer) आपण दररोज कलिंगडचे सेवन निरोगी राहण्यासाठी करायला हवे. त्यात कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. कलिंगडमध्ये (Watermelon) व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक पोषक घटक असतात. हे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी राखते, तुम्ही कलिंगडचा रस देखील घेऊ शकता. हे लाइकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्सचा एक उत्तम स्रोत आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, जाणून घेऊया त्याचे आरोग्य फायदे.
- हायड्रेटेड ठेवते- कलिंगड तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवते. यामध्ये 90 टक्के पाणी असते, कलिंगड पचनसंस्था निरोगी ठेवते, रक्ताभिसरण सुधारते. यामुळे या हंगामामध्ये कलिंगडचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा.
- चयापचय वाढवते- कलिंगड चयापचय वाढवण्यास मदत करते. यामुळे आपण खाल्ले अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते. यामुळे कलिंगडचा जास्तीत-जास्त समावेश हा आपल्या आहारामध्ये करा.
- वजन कमी करण्यासाठी- कलिंगड वजन कमी करण्यास देखील मदत करते. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामध्ये कॅलरी खूपच कमी असतात. यामुळे ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे, त्यांनी याचा आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करावा.
- किडनीच्या आजारांना दूर ठेवते- कलिंगडमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. कॅल्शियम रक्तातील यूरिक ऍसिडला प्रतिबंधित करते. त्यामुळे किडनीचे आजार होण्याचा धोका कमी होतो.
- स्नायू दुखणे- कलिंगडमध्ये सिट्रालिन असते, ते स्नायू दुखणे देखील प्रतिबंधित करते. तुम्ही वर्कआउट करण्यापूर्वी कलिंगडचा रस घेऊ शकता. यामुळे ऊर्जा मिळण्यास मदत होते.
- कॅन्सर धोका कमी- कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे रक्षण करते. फ्री रॅडिकल्समुळे कॅन्सर होण्यासाठी ओळखले जाते. कलिंगडमध्ये असलेले टायकोपीन प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करते.
संबंधित बातम्या :
Health Care : या जीवनसत्वाची कमतरता आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, वाचा हे जीवनसत्व नेमके कोणते?
Skin Care : हळदीसोबत हे कॉम्बिनेशन करून फेसपॅक तयार करा आणि सुंदर त्वचा मिळवा!