रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आजच आहारात दूध हळद घ्या…
शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहार आवश्यक आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नेमके काय खावे हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो.
मुंबई : शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक आहार आवश्यक आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नेमके काय खावे हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी दूध हळद खूप महत्वाचे आहे. कारण हळद आणि दूध पिणे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते आणि यामुळे आपले हाडे मजबुत होतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. (It is beneficial to drink milk and turmeric to boost the immune system)
हळदीच्या दुधामुळे पचन करण्यास मदत करते. यामुळे शरीरातील आंबटपणा कमी होतो. हळद मिसळून जास्त प्रमाणात दूध पिल्यास त्रास होऊ शकतो. म्हणून, एक चिमूटभर हळद दुधात मिसळणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. हळदीच्या दुधाचे आणखी फायदे करून घ्यायचे असतील, तर हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये घालून ते दुध प्यावे.
हळदीचे दूध कर्करोगाच्या रुग्णांसाठी देखील खूप चांगले मानले जाते. हळदीमध्ये आढळणारा करक्युमीन हा घटक कर्करोगाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. तसे, तो कर्करोगाच्या रुग्णांना बरे होण्यासही मदत करतो. हळद असलेले दूध पिण्यामुळे तुमची झोपेची समस्या देखील दूर होते. हळदीयुक्त दुधाच्या सेवनाने चांगली झोप लागते. दुधात अमीनो अॅसिड असतात, जे चांगली झोप देण्यास प्रभावी ठरतात.
जर, तुम्हीलाही झोपेच्या समस्या असतील, तर तुम्ही आजपासून हळदचे दूध पिणे सुरू केले पाहिजे. याने तुम्हाला बराच फायदा होईल. हृदय निरोगी ठेवण्यासाठीही हळद अतिशय प्रभावी ठरते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हळदीचे दूध आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते. ज्यामुळे आपले आरोग्य देखील निरोगी राहते.
(महत्त्वाचं : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण आहाराबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Immunity Booster | थंडीच्या काळात ‘या’ पदार्थांचे सेवन करा आणि इम्युनिटी वाढवा!https://t.co/OaOpxZW9YG#immunityboosters #VitaminC #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 27, 2020
(It is beneficial to drink milk and turmeric to boost the immune system)