मुंबई : आज प्रत्येकजण लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम, डायट आणि उपचार देखील घेतो. परंतु आपणास हे माहित नाही की, आपल्याला फिट आणि फाईन राहण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल. (It is beneficial to mix honey and cinnamon in hot water)
आपण जर दररोज सकाळी झोपीतून उठल्यानंतर व्यायामाला जाण्याच्या अगोदर मध, लिंबू आणि दालचिनीयुक्त गरम पाणी पिले तर आपले वजन झटपट कमी होईल. कारण हे पाणी पिल्यामुळे आपले शरीर गरम होते आणि शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. हे पाणी पिऊन आपण आठ दिवस व्यायाम केला तर झटपट वजन कमी होईल. मात्र, व्यायामाला जाण्याच्या अर्धा तास अगोदर हे पेय प्या.
हे खास पेय फक्त आपले वजन कमी करण्यासाठीच नाहीतर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसेच, मध कफ सहजपणे काढून टाकतो. लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा अधिक असते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. थकवा दूर करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाचा उपयोग केला जातो.
कमी वेळात वजन कमी करायचे असेल, तर दालचिनी युक्त चहाचे सेवन करण्यास सुरुवात करा. दालचिनी चहा वजन नियंत्रणासाठी सर्वोत्तम नैसर्गिक पेय मानला जातो. या चहामध्ये अनेक अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबायोटिक गुणधर्मांसह चयापचय वाढवणारा गुणधर्म देखील आहे. ज्यामुळे तो एक चांगला डीटॉक्स पेय देखील बनतो. दालचिनी चहाचे सेवन केल्यास चरबी लवकर बर्न होण्यास मदत होते.
(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(It is beneficial to mix honey and cinnamon in hot water)