AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 4 घटकांमध्ये बनवा मोमोजसाठी खास लाल चटणी, चव अशी की विसरूच शकणार नाही!

मोमोजसाठी अनेक प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात, पण सर्वांत लोकप्रिय आहे ती लाल रंगाची झणझणीत चटणी. मग जर तुम्हीही मोमोज लव्हर असाल तर पुढच्या वेळी घरच्या घरी मोमोज बनवताना ही खास चटणी सोबत नक्की बनवा.

फक्त 4 घटकांमध्ये बनवा मोमोजसाठी खास लाल चटणी, चव अशी की विसरूच शकणार नाही!
Momos chutneyImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2025 | 4:46 PM

गगरमागरम मोमोज… आणि त्यासोबत मिळणारी ती झणझणीत लाल रंगाची चटणी! तोंडाला पाणी आलं ना? हे कॉम्बिनेशन म्हणजे फूड लव्हर्ससाठी एकदम स्वर्गसुख. मोमोज कितीही चविष्ट असले तरी त्या चटणीशिवाय ते अपूर्णच वाटतात, हो की नाही?

लॉकडाऊनच्या काळात मोमोज सहज मिळणं शक्य नव्हतं. म्हणूनच अनेकांनी घरच्या घरी मोमोज आणि डम्पलिंगसारखा हा स्नॅक स्वतः बनवण्याचा प्रयत्न केला – आणि तो मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरला. यातूनच सिद्ध झालं की आपण मोमोजवर किती प्रेम करतो!

हे लाडके मोमोज नेमके कुठून आले यावर एक नजर टाकूया. काहींचं म्हणणं आहे की मोमोज तिबेटमधून आले, तर काहींच्या मते नेपाळी स्वयंपाक्यांनी त्याला लोकप्रिय केलं. पण मोमोज कुठून आले यापेक्षा, आज ते भारतात किती लोकप्रिय झाले आहेत हे अधिक महत्त्वाचं! तंदूरी मोमोज, फ्रायड मोमोज, अगदी चॉकलेट मोमोजसुद्धा आज खवय्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही डिश सगळ्यांची फेवरिट ठरली आहे.

आता बोलूया या मोमोजसोबत मिळणाऱ्या खास लाल चटणीबद्दल जी मोमोजइतकीच सगळ्यांची फेवरिट आहे. ही चवदार, झणझणीत आणि थोडीशी आंबटसर अशी चव देणारी लाल चटणी बनवणं खूपच सोपं आहे.

झणझणीत मोमोज चटणी रेसिपी

लागणारे साहित्य:

1. सुक्या लाल मिरच्या – १० ते १२

2. लसूण पाकळ्या – ८ ते १०

3. मीठ – चवीनुसार

4. तेल – २ ते ३ टेबलस्पून

(ऐच्छिक – १ टेबलस्पून सिरका / लिंबाचा रस – अधिक झणझणीत व चवदारपणासाठी)

कृती:

सुक्या लाल मिरच्यांना कोमट पाण्यात किमान ३० मिनिटे भिजवा.

आता मिरच्या,(सालीसकट) लसूण, मीठ आणि तेल मिक्सरमध्ये घालून बारीक वाटा.

पाणी न घालता वाटल्यास चटणी अधिक घट्ट होते. हवे असल्यास थोडं पाणी वापरू शकता.

आणि अशी झाली तुमची झणझणीत चवदार चटणी तयार! ही चटणी गरमागरम मोमोजसोबत सर्व्ह करा.

पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.