मुंबई : आपल्या सर्वांना माहित आहे की, फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात अनेक प्रकारची पोषक तत्त्वे असतात, ज्यात जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे घटक तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात मदत करतात. याशिवाय ते शरीरातील टॉक्सिक पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. प्रत्येक फळात प्रामुख्याने विशेष पौष्टिक घटक असतात. एवढेच नाही, तर फळे खाल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहते आणि चयापचय वाढते. फळे आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. पण, तुम्हाला माहित आहे का की, फळे खाण्याची योग्य पद्धत काय आहे? चला तर त्याच्याशी संबंधित गोष्टी जाणून घेऊया…
सेलिब्रिटी डाएटीशियन रुजुता दिवेकर यांनी सांगितले की, फळे आपल्या आहाराचा एक आवश्यक भाग आहेत. फळे खाल्ल्याने आपल्याला लवकर भूक लागत नाही आणि पोट सुद्धा बराच वेळ भरलेले राहते. सकाळच्या नाश्त्यामध्ये दर रोज फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्या म्हणाल्या की, फळे खाताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
बऱ्याच लोकांना फळांबरोबर वेगवेगळ्या गोष्टी मिसळून खाणे आवडते. यामुळे तुमची पचनशक्ती कमकुवत होऊ शकते. वेगवेगळ्या गोष्टी एकत्र खाल्ल्याने शरीराला पोषक घटक पूर्णपणे उपलब्ध होत नाहीत. म्हणून नेहमी नुसतेच फळ खा.
वैज्ञानिकदृष्ट्या फळे खाण्याची योग्य वेळ नाही. तज्ज्ञांच्या मते, लोकांनी नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळी फराळ किंवा कसरत केल्यानंतर फळांचे सेवन केले पाहिजे. फळे ही पोषक तत्वांनी समृद्ध आहे. फळे नेहमी चांगल्याप्रकारे चावून खाल्याने पचनसंस्था मजबूत होते.
फळे कापून खाण्याऐवजी पूर्ण खा. संपूर्ण फळे खाल्ल्याने त्यातील चांगले फायबरही खाल्ले जातात. फळांमध्ये भरपूर फायबर असते, जे पाचन तंत्र मजबूत करण्यास मदत करते. फायबर युक्त पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या इतर समस्या आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळू शकते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Keep these things in mind while eating fruit to stay healthy and fit)
Health Tips | शुद्ध तूप आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या याबद्दल अधिक…
चिकट केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ हेअर मास्क केसांना लावा आणि समस्या दूर करा!