उन्हाळ्यात दही ठरते सुपरफूड, त्वचेपासून आरोग्यापर्यंत अनेक फायदे

दही (Curd) हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.

उन्हाळ्यात दही ठरते सुपरफूड, त्वचेपासून आरोग्यापर्यंत अनेक फायदे
दही
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 1:28 PM

मुंबई : दही (Curd) हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही (Health Benefits). दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. (Know about yogurt benefits during summer)

जेवणात रोज दही खाणे आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधित समस्यांवरदेखील दही खाणे हा उत्तम उपाय आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. मात्र, आता उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात दही खाल्ले पाहिजे.

-दही खाण्याने शरीराचे वजन कमी करण्यात खूप मदत होते. हे सेवन केल्याने आपल्याला जास्त काळ भूक लागणार नाही, जे वजन नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरते.

-दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे.

-केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे.

-दह्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात.

-जर आपण दररोज दह्याचे सेवन केले तर शरीराला नुकसान करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. बॅक्टेरिया नष्ट झाल्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

संबंधित बातम्या : 

(Know about yogurt benefits during summer)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.