Anda Bhurji Recipe : घरच्या-घरी तयार करा खास अंडा भुर्जी, पाहा रेसिपी!

अंडे खायला बऱ्याच लोकांना आवडते. अंड्यापासून विविध प्रकारच्या डिश देखील तयार केल्या जातात. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक अंड्याची स्वादिष्ट डिश घेऊन आलो आहोत. जी तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये समाविष्ट करू शकता. या डिशमध्ये प्रथिने भरपूर आहेत.

Anda Bhurji Recipe : घरच्या-घरी तयार करा खास अंडा भुर्जी, पाहा रेसिपी!
अंडा भुर्जी
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 9:57 AM

मुंबई : अंडे खायला बऱ्याच लोकांना आवडते. अंड्यापासून विविध प्रकारच्या डिश देखील तयार केल्या जातात. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक अंड्याची स्वादिष्ट डिश घेऊन आलो आहोत. जी तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये समाविष्ट करू शकता. या डिशमध्ये प्रथिने भरपूर आहेत आणि वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर होतो. अंड्याची भुर्जी जवळपास सर्वांनाच आवडते. चला जाणून घेऊयात त्याची खास रेसिपी.

अंडा भुर्जी बनवण्यासाठी साहित्य

अंडे – 2

टोमॅटो – 2

हळद – 1/2 टीस्पून

गरम मसाला पावडर – 1 टीस्पून

आवश्यकतेनुसार मीठ

तेल – 2 टीस्पून

कांदा – 1

हिरवी मिरची – 1

लाल तिखट – 1 टीस्पून

आमचूर पावडर – 1 टीस्पून

कोथिंबीर – 2 टीस्पून

जिरे – 1/4 टीस्पून

अंड्याची भुर्जी कशी बनवायची

स्टेप -1

कढईत तेल गरम करा. चांगले गरम झाल्यावर त्यात जिरे घालून चांगले परतून घ्या. आता त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदे घाला. कांदा हलका तपकिरी होईपर्यंत तळू द्या.

स्टेप – 2

आता चिरलेला टोमॅटो आणि मीठ घाला. हळद, लाल तिखट, आमचूर पावडर आणि गरम मसाला घाला. झाकण ठेवून मसाले 5 मिनिटे शिजू द्या.

स्टेप – 3

एका भांड्यात दोन अंडी फोडून नीट फेटून घ्या. हे मिश्रण तयार मसाल्यात घाला. आच मध्यम ठेवा आणि एक मिनिट तसेच राहू द्या. आता स्पॅटुला वापरा आणि चांगले मिसळा. अंड्याचे तुकडे तयार होईपर्यंत मिसळत रहा. आणखी दोन मिनिटे शिजू द्या.

स्टेप -4

आता भुर्जीवर कोथिंबीर टाका आणि गरमागरम सर्व्ह करा.

अंड्याचे आरोग्य फायदे

लोकांना अनेक प्रकारे अंडी खायला आवडतात. अंड्यांमध्ये अनेक गुणधर्म असतात. तसेच यामध्ये अनेक प्रकारची पोषकतत्वे आढळतात. अंडी हा उच्च दर्जाच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, जो तुमच्या स्नायूंच्या दुरुस्तीसाठी खूप उपयुक्त आहे. यासोबतच, तुमच्या रक्तातील साखरेचे व्यवस्थापन, प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. अंड्यामध्‍ये व्हिटॅमिन डी आढळते, जे तुमच्‍या हाडांना मजबूत करण्‍यासाठी फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.